भय इथले संपत नाही, भूकंपाचे तीन मोठे झटके, जागोजागी प्रेतांच्या राशी, आता पुन्हा भयावह संकट

फक्त 12 तासांत 3 वेळा आलेल्या भूकंपानं 1800 हून जास्त लोकांचा जीव घेतलाय. तुर्कीच्या सीमेवर असणाऱ्या एका शहरात या भूकंपाचं केंद्र होतं. ज्याचे हादरे तुर्कीच्या शेजारी असलेल्या 3 देशानांही बसले.

भय इथले संपत नाही, भूकंपाचे तीन मोठे झटके, जागोजागी प्रेतांच्या राशी, आता पुन्हा भयावह संकट
earthquakeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 11:52 PM

अंकारा : मध्यपूर्वेत 12 तासात 3 वेळा झालेल्या भूकंपानं 1800 हून जास्त लोकांचा जीव घेतलाय. आणि डझनभर शहरांमधल्या इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या. 12 तासात मध्यपूर्वेतल्या तुर्की, सिरिया, लेबनॉन आणि इस्रायल या चार देशांमध्ये भूकंप झाला. मात्र सर्वाधिक नुकसान तुर्कीला झालं. विशेष म्हणजे तुर्की या संकटाची झळ सोसत असताना अजूनही संकटांची मालिका संपलेली नाही. तुर्कीवर आणखी संकटाचे ढग आहेत. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीत पुन्हा भूकंपाची भीती आहे. याशिवाय तिथे वादळी वारे वाहत आहेत. तसेच हिमवृष्टी देखील सुरु आहे. पाऊस सारखा थोड्या-थोड्या वेळाच्या फरकाने कोसळतोय. त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.

या भयावह भूकंपामुळे टोलेजंग इमारती काही सेकंदात कोसळल्या आहेत. मोठ-मोठी कार्यालय जमीनदोस्त झाली. अनेक निवासी भागात फक्त घरांचा ढिगाराच उरला.

हे सुद्धा वाचा

फक्त 12 तासांत 3 वेळा आलेल्या भूकंपानं 1800 हून जास्त लोकांचा जीव घेतलाय. तुर्कीच्या सीमेवर असणाऱ्या एका शहरात या भूकंपाचं केंद्र होतं. ज्याचे हादरे तुर्कीच्या शेजारी असलेल्या 3 देशानांही बसले.

मिळालेल्या माहितीनुसार तुर्कीतल्या उस्मानी, अदियामन, अडाना अशा 10 शहरांना भूकंपाचे धक्के बसले. ही सर्व दहाच्या दहा शहरांची गणना तुर्कीतल्या मोठ्या शहरांमध्ये होते.

दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाची तीव्रता कैद झालीय. दरम्यान, जमिनीत पडलेल्या भेगांमधून अनेकांना सुरक्षितपणे वाचवलं गेलं. अनेक मोठ्या महामार्गांना भूकंपाचा फटका बसल्यामुळे महामार्ग भूकंपाच्या हादऱ्यांनी विभागले गेले .

भूकंपाचं केंद्र तुर्कीमधलं गांजियाटेप नावाचं हे शहर होतं. हे शहर सीरियाच्या सीमेजवळ असल्यामुळे भूकंपाचे धक्के तुर्कीबरोबरच सिरिया लेबनॉनसहीत इस्रायला सुद्धा बसलं.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत सर्व जगानं झालेल्या नुकसानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांना भूकंपग्रस्त भागासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.