AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 वर्षांनंतर असा शक्तिशाली भूकंप, 22 मजल्याची बिल्डिंग क्षणात कोसळली, फक्त व्हेनेझुएला, जपानच नाही तर, भारतातील ‘या’ राज्यात भूकंपाचे धक्के

Earthquake : व्हेनेझुएला आणि जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जगात खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएला येथे आलेल्या भूकंपात 22 मजल्याची बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली असून मोठं नुकसान झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त व्हेनेझुएला, जपानच नाही तर, भारतातील 'या' राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

100 वर्षांनंतर असा शक्तिशाली भूकंप, 22 मजल्याची बिल्डिंग क्षणात कोसळली, फक्त व्हेनेझुएला, जपानच नाही तर, भारतातील 'या' राज्यात भूकंपाचे धक्के
Earthquake
| Updated on: Jun 25, 2026 | 9:20 AM
Share

Earthquake : जगभरात अनेक ठिकाणी गुरुवारी भूकंपाचे झटके जाणवले आहेत. व्हेनेझुएलामध्ये आलेल्या भूकंपाने सर्व होत्याचं नव्हतं केलं आहे. धक्कादायक म्हणजे फक्त व्हेनेझुएला आणि जपानमध्येच नाही तर भारतात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भारतातील जम्मू – काश्मीर येथे देखील जमीन हादरली आहे. जम्मू – काश्मीर येथील  पुलवामा येथे भूकंपाचे झटके नागरिकांना जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. मात्र, आतापर्यंत कोणतं नुकसानाची बातमी समोर आलेली नाही. पण भूकंपाने धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्या भीतीचं वातावरण आहे.

मात्र, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे राजधानी काराकसमध्ये इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असं देखील सांगण्यात येत आहे की, गेल्या 100 वर्षांनंतर आलेला हा सर्वात शक्तीशाली भूकंप आहे. एवढंच नाही तर जपान येथे देखील 6.9 तिव्रतेचा भूकंप जाणवला.

व्हेनेझुएलात आलेल्या भूकंपामध्ये 22 मजली बिल्डिंग कोसळली..

व्हेनेझुएला येथे आलेला भूकंप इतका शक्तीशाली होता की, 22 मजल्याची बिल्डिंग एखाद्या पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली.. बुधवारी संध्यकाळी (तेथील स्थानिक वेळेनुसार) एका भागात 7.2 आणि 7.5 तिव्रतेचे 2 भूकंप आले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या. राजधानी काराकसमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे. तर लोक भीतीने घराबाहेर पळत आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप

गुरुवारी पहाटे नेपाळमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला; हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजून 21 मिनिटे 43 सेकंदांनी झाला. राविवारी देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.. जपान येथील दुर्गम आणि डोंगराळ भाग हुमला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता असलेल्या त्या भूकंपाचा केंद्रबिंदू हुमला जिल्ह्यातील श्रीनगर भागात होता. मात्र, यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Follow Us
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...