शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याहस्ते अहमदाबादच्या दुबई कँपसचे उद्घाटन, म्हणाले की, ‘भारताची सर्वोत्तम प्रतिभा जगभर पोहचणार

दुबईच्या क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते आयआयएम अहमदाबादच्या दुबई कँपसचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर सामील झाले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याहस्ते अहमदाबादच्या दुबई कँपसचे उद्घाटन, म्हणाले की, भारताची सर्वोत्तम प्रतिभा जगभर पोहचणार
Education Minister Dharmendra Pradhan inaugurated Ahmedabad's Dubai Campus
| Updated on: Sep 11, 2025 | 6:56 PM

आयआयएम अहमदाबादने दुबईत आपला नवीन कँपस सुरु केला आहे. गुरुवारी दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी या नव्या कँपसचे उद्घाटन केले. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील या कार्यक्रमात सामील झाले. या कार्यक्रमानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की भारतीय शिक्षणाच्या जागतिकीकरणात ही मोठी झेप आहे. हा कँपस भारताच्या श्रेष्ठतम प्रतिभेला जगात पोहचवेल.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान दोन दिवसांच्या युएईच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांदरम्यानचे सहकार्य वाढवणे हा या दौऱ्याचा उद्देश्य आहे.या दरम्यान आधी परदेशी अटल इनक्युबेशन सेंटर आणि आयआयएम अहमदाबादच्या दुबई कँपसचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य यांच्या शक्यतांचा शोध घेणे. शैक्षणिक उत्कृष्टता आणि नव्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि दोन्ही देशांच्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी परस्परांच्या मदतीने नवे मार्ग शोधणे हा या भेटीचा उद्देश्य आहे.

येथे ट्वीट पाहा –

शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट करुन माहिती दिली

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आयआयएम अहमदाबादच्या दुबई कँपसच्या उद्घाटनाची माहिती देताना एक्सवर लिहिले की , ‘दुबईच्या काऊन प्रिन्स प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते आयआयएम अहमदाबाद कँपसचे उद्घाटन करणे हे आमच्यासाठी सौभाग्याची आणि आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे.आयआयएम अहमदाबाद दुबई परिसरात भारताच्या सर्वोत्तम प्रतिभेला जगापर्यंत पोहचवेल. दुबई आज आयआयएम अहमदाबाद आंतरराष्ट्रीय कँपसचे उद्घानाचे यजमान झाल्याने भारतीय भावना, जागतिक दृष्टीकोनाच्या सिद्धांताला एक आदर्श व्यासपीठ प्रदान केले आहे.भारत – युएई ज्ञान सहयोगात एक गौरवशाली अध्याय जोडण्यासाठी शेख हमदान यांचे आभार’

येथे पोस्ट पाहा –

आयआयटी दिल्लीच्या अबूधाबी कँपसला भेट

या दौऱ्यादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण, नवी उपक्रम आणि ज्ञानाची देवाण-घेवणात भागीदारीला पुढे नेण्यासाठी युएईचे प्रमुख नेते, मंत्री, धोरणनिर्माते आणि शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय आणि युएई संस्थेचे प्रतिनिधी यांच्याशी बोलणी केली. बुधवारी धर्मेद्र प्रधान यांनी अबूधाबी शिक्षण तसचे ज्ञान विभागाचे अध्यक्ष सारा मुसल्लम यांची भेट घेतली. त्यांनी आयआयटी दिल्ली – अबू धाबी कँपसला देखील भेट दिली.