जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कने प्रतितास 127 कोटी रुपये कमावले, जाणून घ्या कसे?

कोरोना विषाणूमुळे उद्योगधंद्यांमध्ये मंदी असतानाही मागील 12 महिन्यांमध्ये टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत 150 अब्ज डॉलरची वाढ झालीय.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कने प्रतितास 127 कोटी रुपये कमावले, जाणून घ्या कसे?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 3:39 PM

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूमुळे उद्योगधंद्यांमध्ये मंदी असतानाही मागील 12 महिन्यांमध्ये टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत 150 अब्ज डॉलरची वाढ झालीय. यासह ते जगातील सर्वात वेगाने कमाई करणारे उद्योगपती ठरले आहेत. मस्क यांनी मागील एका वर्षात दर तासाला 1.736 कोटी डॉलर म्हणजेच 127 कोटी रुपये कमावले. त्यामुळे जगातील महत्त्वाच्या कंपनींपैकी एक असलेल्या ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीही जोरदार वाढल्या आहेत (Elon Musk earn Rs 127 Crore every hour become worlds richest businessman).

सातत्याने नफा आणि प्रतिष्ठित एस अँड पी 500 इंडेक्समध्ये (S&P Index) समावेश झाल्याने मागील वर्षी कंपनीच्या शेअरच्या किमतीत 743 टक्के वाढ झाली. टेस्लाचे शेअर्स 816 डॉलरच्या सर्वोच्च किंमतीने ट्रेड होत होते.

टेस्लाच्या शेअर्समध्ये 3 पटीने वाढ होण्याची शक्यता

विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियात डेमॉक्रेट्स उमेदवाराचा विजय झाल्याने टेस्लाची आशा वाढली आहे. कारण डेमॉक्रेटीक पार्टी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या बाजूची आहे. बिलिनेअर गुंतवणूकदार Chamath Palihapitiya यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाच्या शेअरची किंमत सध्या असलेल्या किमतीच्या जवळपास 3 पट वाढण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर एलन मस्क जगातील पहिले ट्रिलिनेअर होतील.

Chamath Palihapitiya यांनी गुरुवारी (7 जानेवारी) सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत गुंतवणूकदारांना टेस्लाचे शेअर्स विकू नका असा सल्ला दिला. तसेच कमी काळात फायदा देण्यावर विश्वास न ठेवणाऱ्या एलन मस्कसारख्या उद्योगपतींना पाठिंबा द्या असंही त्यांनी यावेळी आवाहन केलं.

Bloomberg Billionaires Index ने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती बेजोस यांच्यापेक्षा 3 अब्ज डॉलरने कमी होती. बेजोस ऑक्टोबर 2017 पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या जागेवर बसलेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर होती. मात्र गुरुवारी टेस्लाच्या शेअरच्या वाढलेल्या किमतीने बेजोस यांचा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान एलन मस्क यांच्याकडे गेलाय.

हेही वाचा :

जेफ बेझोस पिछाडीवर, आता ‘ही’ व्यक्ती ठऱली जगात सर्वात श्रीमंत; संपत्ती तब्बल 1,38,42,78,96,75,000 रुपये

कोरोनाकाळात सर्वाधिक कमाई करणारे 5 उद्योगपती, पहिला कोण?

युजरच्या डोक्यात काय विचार सुरु ते फेसबुकला कळणार?

Elon Musk earn Rs 127 Crore every hour become worlds richest businessman

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.