AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दृष्टीहिन बघू शकणार, एलोन मास्क करणार चमत्कार

एलोन मास्क यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली. जगाला एक मोठा आशेचा किरण मिळाला. जर एलोन मास्क यांनी बोलले खरे झाले तर हा फक्त त्यांच्याच नाही तर जगाचा मोठा विजय असणार आहे.

दृष्टीहिन बघू शकणार, एलोन मास्क करणार चमत्कार
Elon Musk
| Updated on: Aug 03, 2026 | 8:36 AM
Share

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (AI) जागतिक स्तरावर दोन अत्यंत भिन्न दृष्टिकोन समोर येत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलोन मास्क असा अंदाज वर्तवत आहेत की, पुढील दशकात पैशाचे महत्त्व जवळपास संपुष्टात येऊ शकते. यासोबतच आता एलोन मास्क यांनी दुसरा एक मोठा दावा केला. हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा आहे. दृष्टीहिन लोक देखील लवकरच बघू शकणार आहेत. एलोन मास्क यांची अमेरिकन न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी न्यूरालिंक (Neuralink) अशा एका ब्रेन इम्प्लांटवर म्हणजेच मेंदूत बसवल्या जाणाऱ्या उपकरणावर काम करत आहे, ज्यामुळे अंध व्यक्तींना पाहण्याची क्षमता मिळू शकेल. जर हा यशस्वी झाले तर हा मोठा अविष्कार म्हणावा लागेल. जगात हजारो व्यक्ती आहेत, ज्यांना दृष्टी नाही तर जे याच जगात जगतात. मात्र, जग नक्की कसे आहे, हेच त्यांना कळत नाही. त्यांना काहीच दिसत नाही.

एलोन मास्क यांनी या तंत्रज्ञानाला ब्लाईंडसाईट म्हटले. माणसावरील पहिली चाचणी झाल्याचेही कळतंय. सप्टेंबर 2024 मध्ये ब्लाईंडसाईटला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून (FDA) ब्रेकथ्रू डिव्हाइसचा दर्जा मिळाला. गंभीर किंवा जीवघेण्या आजारांवर उपचार करण्याच्या दृष्टीने उपकरणांना हा दर्जा दिला जातो. यादरम्यानच आता एलोन मास्क याच्याकडून मोठा दावा करण्यात आला.

एलोन मास्क यांनी म्हटले की, पुढील 6 ते 12 महिन्यांत आम्ही दृष्टीसाठीचे पहिले उपकरण बसवणार आहोत. एखादी व्यक्ती जन्मापासून पूर्णपणे अंध असली तरीही आम्ही त्यांच्या व्हिज्युअल कॉर्टेक्सला म्हणजे मेंदूचा दृष्टीशी संबंधित एक महत्वाचा भागाला सिग्नल पाठवू आणि त्या व्यक्तीला पाहता येईल. त्या व्यक्तीला पूर्णपणे दृष्टी मिळेल.

पुढे त्यांनी म्हटले की, ही तर फक्त सुरुवात आहे. काही काळातच तुम्हाला अल्ट्रा-एचडी रिझोल्यूशनची क्षमता मिळेल, ज्यामुळे तुम्ही इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट आणि अगदी रडारसारख्या गोष्टीही पाहू शकाल. ते पण अगदी एखाद्या सुपरहिरोप्रमाणे… जर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर ते विज्ञान आणि वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांति ठरेल.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष