AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk Tweet: मी गूढरित्या मेलो तर… एलन मस्क यांच्या ट्विटने खळबळ

Elon Musk Tweet: जर गूढरित्या माझा मृत्यू झाला तर ते nice knowin ya असेल, असं मस्क यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Elon Musk Tweet:  मी गूढरित्या मेलो तर... एलन मस्क यांच्या ट्विटने खळबळ
एलन मस्क Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2022 | 8:20 AM
Share

मास्को: ट्विटर(Twitter) खरेदी केल्याने एलन मस्क सध्या चर्चेत आहेत. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच एलन मस्क (Elon Musk) यांच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. एलन मस्क यांनी आपल्या संशयास्पद मृत्यूबाबतचं ट्विट केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या ट्विटवर जगभरातील नागरिकांच्या रिअॅक्शन येत आहेत. विशेष म्हणजे या ट्विटमधून एलन मस्क यांनी रशिया आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यामुळे पुतीन यांच्यावरील टीकेला अनेकांनी समर्थन केलं आहे. तर काहींनी मस्क यांच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. मस्क यांनी केलेल्या ट्विटचा थेट अंदाज करता येत नाहीये. त्यांनी आपल्या ट्विटमधून एका गाण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जगभरातील लोक आपआपल्या परिने या ट्विटचा अर्थ लावत असून त्यावर आपआपल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. तसेच मस्त यांचं हे ट्विट शेअरही केलं जात आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

जर गूढरित्या माझा मृत्यू झाला तर ते nice knowin ya असेल, असं मस्क यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मस्क यांच्या या ट्विटचा थेट अर्थ लावता येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण समजेल तसा अर्थ लावत आहे. त्यातच मस्क यांनी nice knowin ya या गाण्याचा उल्लेखही ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळेही संभ्रम वाढला आहे.

जोरदार व्हायरल

दरम्यान, मस्क यांचं हे ट्विट टाईमलाईनवर येताच व्हायर होत आहे. अनेक लोक हे ट्विट एकमेकांना शेअर करत आहेत. पहिल्या तासाभरात मस्क यांचं हे ट्विट कमीत कमी 33 हजार लोकांनी शेअर केलं आहे. तसेच या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

आठवड्याभरानंतर ट्विट

मस्क यांनी या ट्विटमध्ये एका भाषांतरीत मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. मास्कोचे अंतराळ प्रमुख दिमित्री रोगोजीन यांनी हा मेसेज पाठवला आहे, असं मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांनी 44 अब्जल डॉलरला ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर एक आठवड्यानंतर मस्क यांनी ट्विट केलं आहे. यापूर्वी मस्क यांनी नाझी या शब्दाचा अर्थ सांगितला होता. व्यक्ती जो विचार कते, तेच करते असा नाझी शब्दाचा अर्थ नाही, असं ट्विट मस्क यांनी केलं होतं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.