‘8 तास टॉयलेटला जाऊ दिले नाही’, भारतीय बिझनेसवुमनला अमेरिकन विमानतळावर चुकीची वागणूक

Entrepreneur Shruti Chaturvedi: उद्योजक श्रुती चतुर्वेदी हिने अलास्काच्या अँकोरेज विमानतळावर पोलीस आणि एफबीआयवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर करताना ती म्हणाली की, एका पुरुष अधिकाऱ्याने कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली शारीरिक तपासणीही केली.

8 तास टॉयलेटला जाऊ दिले नाही, भारतीय बिझनेसवुमनला अमेरिकन विमानतळावर चुकीची वागणूक
| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 10:45 AM

अमेरिकेतील एका विमानतळावर एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला 8 तास ताब्यात घेतल्याचा आरोप श्रुती चतुर्वेदी या भारतीय उद्योगपतीने केला आहे. सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर करताना उद्योगपती श्रुती चतुर्वेदी म्हणाल्या की, एका पुरुष अधिकाऱ्याने कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली शारीरिक तपासणीही केली. यासंबंधी उद्योगपती श्रुती चतुर्वेदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

श्रुती चतुर्वेदीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत लिहिले की, “मला आता कशाचीही कल्पना करण्याची गरज नाही कारण मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट 7 तास आधीच घालवले आहेत.

श्रुती म्हणाल्या की, त्यांच्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक होती, जी अलास्काच्या अँकोरेज विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटली. आठ तासांच्या नजरकैदेत असताना त्यांना शौचालयात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

‘ही’ घटना सोशल मीडियावर व्हायरल

जनसंपर्क कंपनी चालवणाऱ्या श्रुती चतुर्वेदी यांनी सांगितले की, अमेरिकेत एफबीआय आणि पोलिसांनी तिला आठ तास ताब्यात घेतले होते. “कल्पना करा, तुम्हाला कोणतेही मोठे कारण नसताना तासंतास बसवले जाते, अनावश्यक गोष्टी विचारल्या जातात, एक पुरुष अधिकारी कॅमेऱ्यासमोर तुमचे शरीर तपासतो, तुमचे उबदार कपडे, मोबाइल, पर्स हे सर्व काढून घेतले जाते, थंड खोलीत ठेवले जाते, टॉयलेटला जाऊ दिले जात नाही, कोणालाही फोन करू दिला जात नाही आणि मग तुमची फ्लाईट चुकते. हे सर्व माझ्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक असल्यामुळेच घडले, ज्याला तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ‘संशयास्पद’ मानले.

 

श्रुती चतुर्वेदीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत लिहिले की, “मला आता कशाचीही कल्पना करण्याची गरज नाही कारण मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट 7 तास आधीच घालवले आहेत आणि हे का घडले हे आम्हाला माहित आहे.” मी अनेक पोस्ट लिहिल्या. पण या नव्या घटनेने त्यांच्या भेटीचे संपूर्ण वातावरणच बदलून टाकले.

श्रुतीने शेअर केला फोटो

श्रुती चतुर्वेदी ने 30 मार्च रोजी सोशल मीडियावर नॉर्दन लाइट्सचे सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, “अलास्काला उड्डाण केले, डाल्टन हायवेपार केले, आर्क्टिक सर्कल ओलांडले आणि रात्री खोलीच्या बाल्कनीतून नॉर्दन लाइट्स पाहिले. हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खास आणि संस्मरणीय होता, हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होत होतं.