Epstein Files : ‘रात्री भेटायला बोलावलं..’ एपस्टीन फाइल्समध्ये नाव आलेल्या भारतीय वंशाच्या गुरुवर खळबळजनक आरोप

Epstein Files :'पुरुष गुरु फक्त बनवलेली एक प्रतिमा आहे. पण मुली खरच समजूतदार असतात' तिची ही लाइन सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर काही तासात हजारो लाइक्स आले आहेत.

Epstein Files :  रात्री भेटायला बोलावलं.. एपस्टीन फाइल्समध्ये नाव आलेल्या भारतीय वंशाच्या गुरुवर खळबळजनक आरोप
Epstein Files
| Updated on: Feb 06, 2026 | 1:59 PM

भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकी लेखक आणि वेलनेस आयकॉन दीपक चोपडा यांच्याबद्दलचा वाद वाढत चालला आहे. आर्टिस्ट आणि एंटरप्रेन्योर सेव्दा रूबेंसने त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘मी 16 वर्षांची असताना दीपक चोपडा यांनी माझ्याशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला होता’ असा तिचा आरोप आहे. एका मेडिटेशन प्रोग्रॅममध्ये दीपक चोपडा कथितरित्या माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागले. मेडिटेशन प्रोग्रॅम दरम्यान दीपक चोपडा यांनी मला रात्री भेटायला बोलावलं होतं, असं सेव्दा रूबेंसचा दावा आहे.

सेव्दाने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करुन चोपडा यांच्यावर आरोप केले. ते व्हायरल झाले आहेत. त्या पोस्टवर आता 19 लाखापेक्षा जास्त व्यूज आहेत. बदनाम फायनान्सर जेफरी एपस्टीन यांच्याशी संबंधित ईमेल्समध्येही दीपक चोपडा यांचं नाव आलय. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी दीपक चोपडा यांचं नाव आल्याने पावर, सेलिब्रिटी, संस्कृती आणि अध्यात्मिक क्षेत्रात नवीन वाद सुरु झालाय.

पुरुष गुरु फक्त बनवलेली एक प्रतिमा

सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स, इन्स्टाग्राम आणि ग्लोबल वेलनेस फोरम्स वर लोग यावरुन प्रश्न विचारतायत.अनेक लोकांनी प्रभावशाली पुरुष गुरु आणि त्यांच्या पाठिराख्यांमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. एपस्टीनशी संबंधित ईमेल्समध्ये नाव आल्यानंतर दीपक चोपडा यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या प्रतिक्रियेवर रुबेंसने लिहिलिय की, “मेडिटेशन प्रोग्रॅम दरम्यान चोपडा यांनी कथितरित्या त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर मला दिला. रात्री उशिरा मला भेटायला सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाली. त्यांना नकार दिला व तिथून निघून आली” ‘पुरुष गुरु फक्त बनवलेली एक प्रतिमा आहे. पण मुली खरच समजूतदार असतात’ तिची ही लाइन सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर काही तासात हजारो लाइक्स आले आहेत.

याचमुळे सेलिब्रिटी गुरु खतरनाक ठरु शकतात

रुबेंस प्रमाणे अनेक महिलांनी अध्यात्मिक आणि वेलनेस स्पेसमध्ये हेच अनुभवल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलय ‘याचमुळे सेलिब्रिटी गुरु खतरनाक ठरु शकतात. त्यांच्याकडे सत्ता असते. पण कुठलं उत्तर देण्याची जबाबदारी नसते’ व्हायरल पोस्टमध्ये एका थ्रेडमध्ये रुबेंसने बरच काही लिहिलय. “वयाच्या 16 व्या वर्षी मी आई-वडिलांचं घर सोडलं. एका छोट्याशा खोलीत रहायची व स्वत:ला संभाळण्याासाठी अनेक नोकऱ्या केल्या. मला आयुष्यात कोणी रोखणारं-टोकणारं नव्हतं” असं तिने लिहिलय.