
Epstein Files: शुक्रवारी, अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टाईनशी संबंधित हजारो फाईल्स जारी केल्या आहे. ज्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या विधेयकानुसार 30 दिवसांच्या आत जाहीर करणं आवश्यक होतं. या फाईल्समध्ये एपिस्टन द्वारे वापरली मालीश पद्धती आणि आयुर्वेदाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये असं देखील म्हटलं आहे की, पाश्चिमात्य देशांमधील अनेक चिकित्सक आता भारतातील या 5 हजार वर्ष जुन्या नैसर्गिक उपचार पद्धतीवर आधारित मालिश आणि इतर उपचार देत आहेत. फाईलमध्ये ‘द आर्ट ऑफ गिविंग मसाज’ या नावाने एक आर्टिकल देखील आहे. ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशनसाठी तिळाच्या तेलाचा वापर केल्याचा देखील उल्लेख आहे.
एपिस्टनबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये एपिस्टन याने मॅनहट्टन तुरुंगात आत्महत्या केली. त्याच्यावर असंख्य अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि तस्करी यांसारखे गंभीर आरोप होते. एपिस्टन याचे जगातील दिग्गज व्यक्तींसोबत संबंध होते..
एपिस्टन फाईलमध्ये अनेक कागदपत्र आणि फोटो देखील आहेत… समोर आलेल्या माहितीनुसारत, फाईलमध्ये असलेल्या एका कागदपत्रात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मालिश आणि आयुर्वेदाचा वापर केल्याचा उल्लेख आहे. याचा संबंध थेट भारतीय आयुर्वेदाशी असल्याची माहिती देखील समोर येत आहे…
फाईलमध्ये सांगितल्यानुसार, ‘पाश्चिमात्य देशांमधील अनेक चिकित्सक भारतातील 5 हजार जुन्या प्रणालीवर आधारित मालीश आणि उपचार देत आहेत…’ फाईलमध्ये ‘द आर्ट ऑफ गिविंग मसाज’ या नावाने एक आर्टिकल देखील असल्याचं सत्य समोर आलं आहे… ज्यामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी तेलाचा उपयोग केला जातो… असं देखील सांगण्यात आलं आहे.
एपस्टाईन फाईल समोर आल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. फाईलमध्ये ट्रम्प यांचं फार कमी फोटो आहेत. पण समोर आलेले कागदपत्र आणि फोटो पूर्ण नसल्याचं देखील न्याय मंत्रालयाने मान्य केलं आहे. सांगायचं झालं तर, एपस्टाईनच्या फाईल्स राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहेत.
डेमोक्रॅट्सनी बऱ्याच काळापासून या फाईल्स जारी करण्याची मागणी केली होती… अशी देखील माहिती समोर येत आहे, अनेक वर्षांपासून ट्रम्प आणि एपस्टाईन मित्र होते. पण नंतर त्यांच्या संबंध बिघडले… फाईनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील काही आक्षेपार्ह फोटो आहेत. तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मायकेल जॅक्सन यांचे एपस्टाईनसोबतचे फोटो देखील समोर आले आहेत. ट्रम्प किंवा क्लिंटन दोघांवरही एपस्टाईनशी संबंधित कोणत्याही गैरकृत्याचा आरोप नाही.