जगाला ज्याची भीती तेच घडले, होर्मुज खाडीतून हाहाकार उडवणारा अहवाल पुढे, तब्बल 6 महिने…

इराण अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. जगाला या युद्धात मोठा झटका बसला. परिस्थिती अधिक घातक होत आहे. त्यामध्येच आता झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. युद्ध थांबले तरीही दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

जगाला ज्याची भीती तेच घडले, होर्मुज खाडीतून हाहाकार उडवणारा अहवाल पुढे, तब्बल 6 महिने...
Strait of Hormuz
| Updated on: Apr 23, 2026 | 1:06 PM

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला. तिथेच चूक झाली आणि संपूर्ण जग एका खाडीत ढकलले गेले. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष वेगळेच घडले. या युद्धाची झळ जगातील सर्वच देशांना सोसावी लागत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबवे आणि होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही जगाची इच्छा आहे. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात कायमस्वरूपी युद्धविरामाची घोषणा झाली तरीही परिस्थिती सामान्य होण्यासाठी मोठा काळ लागणार आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती युद्धबंदीनंतरही लगेचच सामान्य होणार नाही, ही वस्तू स्थिती आहे.

पेंटागॉनने उघड केले आहे की, होर्मुज खाडीत इराणकडून भूसुरुंग पेरण्यात आली. ही भूसुरुंग काढण्याकरिता सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ कमीत कमी लागू शकतो. जोपर्यंत होर्मुज खाडी सुरक्षित होणार नाही. ज्याचा जगाच्या तेल निर्यात आणि आयातवर थेटपणे परिणाम होईल. आता जरी युद्धबंदीची घोषणा झाली तरीही परिस्थिती लगेचच सामान्य होणार नाही.

होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजीचे संकट आहे. शिवाय तेलाची निर्यात आणि आयात थांबली. परिस्थितीमधून मार्ग निघेल, अशी अशा जगाला आहे. पण वस्तूस्थिती खूप जास्त वेगळी आहे. अमेरिकेकडून होर्मुज खाडीत मोठी नाकेबंदी करण्यात आली. या नाकेबंदीमुळे इराणची कोंडी झाली.

इराणकडून अगोदर घोषणा करण्यात आली की, होर्मुज खाडी आमच्या मित्र देशांकरिता खुली आहे. पण इराणची परवानगी घेतल्याशिवाय होर्मुज खाडीचा वापर करता येणार नाही. इराणचे अधिकारी तुम्हाला होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देऊ शकतात. भारताच्या दिशेने निघालेले जहाज इराणकडून जप्त करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती अधिक बिघडत आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीला काही यश मिळत नाही. रशियाकडूनही शांतता प्रस्ताव युद्धात देण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us