डोनाल्ड ट्रम्प यांना घेरले, भारत टॅरिफच्या विरोधात थेट मैदानात, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रात्रीच…

भारताकडून टॅरिफचा जोरदार विरोध केला जात आहे. त्यामध्येच आता भारत थेट याच्याविरोधात उतरला आहे. घडामोडींना प्रचंड असा वेग आला असून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे काल रात्रीच मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. हा भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्काच आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना घेरले, भारत टॅरिफच्या विरोधात थेट मैदानात, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रात्रीच...
| Updated on: Aug 20, 2025 | 8:53 AM

भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून वाद सुरू असतानाच आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अचानक रात्री मॉस्कोमध्ये पोहोचले. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, एस जयशंकर हे तीन दिवसीय रशियाच्या दाैऱ्यावर आहेत. मुळात म्हणजे सध्याच्या घडामोडीला एस जयशंकर यांचा हा दाैरा अत्यंत महत्वाचा समजला जातोय. जयशंकर हे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेने भारतावर ज्यापद्धतीने टॅरिफ लावला आहे, त्याला रशियाकडून विरोध केला जात आहे. अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या देशांवरच टॅरिफ लावला.

भारतावर टॅरिफ लावल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. हेच नाही तर टॅरिफच्या विषयावरून ते सतत नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधत आहेत. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल फोनवरून चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, जयशंकर यांचा दौरा 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान असणार आहे. 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-रशिया 26 व्या बैठकीचे सह-अध्यक्षत्व करतील.

यावेळी ते भारत-रशिया बिझनेस फोरमलाही संबोधित करतील.  जागतिक मुद्द्यांवर भारत या बैठकीत रशियासोबत चर्चा करेल. भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणे असल्याचे या दाैऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आलंय. मात्र, एस जयशंकर यांचा रशिया दाैरा हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्काच म्हणाला लागेल. कारण अमेरिकेसमोर न झुकता हा दाैरा भारताकडून केला जात आहे.

रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. या बैठकीत टॅरिफच्या विषयावर देखील चर्चा होणार आहे. अमेरिका ही युक्रेन आणि रशियाच्या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, दुसरीकडे भारताला मोठ्या धमक्या देत आहे. भारताने या दाैऱ्याच्या माध्यमातून परत एकदा स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही भारत अमेरिकेसमोर अजिबात झुकणार नाहीये.