भारत आणि अमेरिकेत टॅरिफ वाद, पुतिन यांचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन, पुढे…
रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील संवाद वाढला आहे. भारताच्या टॅरिफच्या वादानंतर पुतिन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आहे.

रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 15 ऑगस्टला एक बैठक झाली. या भेटीमध्ये युक्रेनच्या युद्धाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात देखील बैठक झाली. या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. रिपोर्टनुसार, पुतिन यांनी रशियामध्ये जेलेंस्की यांना भेटण्याची ऑफर दिली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की आणि युरोपियन नेत्यांचे एक शिष्टमंडळ ट्रम्प यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आले तेव्हा ही ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळतंय.
सूत्रांनी स्पष्ट केले की, पुतिन-जेलेंस्की भेटीशी संबंधित चर्चा सुरू आहेत. मात्र, त्या किती खऱ्या हे सांगणे कठीण आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही चर्चा खोटी आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की पुतिन आणि जेलेंस्की यांच्यातील बैठकीवर चर्चा सुरू आहे आणि अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे. म्हणजे अमेरिकेच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये चर्चा ही केली जाऊ शकते.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पुढे जाऊन पुतिन आणि जेलेंस्की यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव दिला आहे. आता हा प्रस्ताव दोघांकडूनही मान्य केला जातो का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये संवाद संपला आहे. युद्ध भयानकर स्थितीमध्ये येऊ थांबले आहे. भारताच्या टॅरिफच्या मुद्द्यावर पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला. दोघांमध्ये टॅरिफबद्दल चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
व्हाईट हाऊसमधील बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत फोनवर संवाद साधला आणि उपस्थित नेत्यांना सांगितले की, या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, या बैठकीबद्दल पुतिन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नाहीये. दोन्ही नेते एकमेकांसमोर बैठकीला बसणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिका युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात सैन्य साहित्य घेत आहे. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत.
