AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानातून प्रॉपर्टीची चक्रावून टाकणारी बातमी, जनरल बाजवांची सून अचानक अब्जाधीश कशी झाली?

जनरल बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नव्हते तेव्हा त्यांची पत्नी आयशा आयकरदेखील भरत नव्हत्या, मात्र आता त्या अब्जाधीश झाल्याचा दावा करण्यात आलाय.

पाकिस्तानातून प्रॉपर्टीची चक्रावून टाकणारी बातमी, जनरल बाजवांची सून अचानक अब्जाधीश कशी झाली?
Image Credit source: social media
| Updated on: Nov 21, 2022 | 1:22 PM
Share

Pakistan Qamar Javed Bajwa Family Property: पाकिस्तानचे लष्कर प्रमुख (Pakistan Army Chief) जनरल कमर जावेद बाजवा  यांच्या प्रॉपर्टीसंबंधी चक्रावून टाकणारी एक बातमी समोर आली आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी जनरल बाजवा निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच त्यांच्या संपत्तीच्या आकड्यांवरून धक्कादायक खुलासा झाला आहे.

मागच्या सहा वर्षांतच त्यांच्या कुटुंबियांच्या प्रॉपर्टीमध्ये (Property) अचानक वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तान आणि विदेशातील प्रॉपर्टी तसेच व्यवसायांचे एकूण मूल्य सध्याच्या मार्केट मूल्यानुसार 12.7 अब्जांपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आलाय.

जनरल बाजवा यांच्या मुलाचं लग्न नुकतंच  02 नोव्हेंबर रोजी झालं. मात्र तत्पुर्वी 9 दिवस आधीच सुनबाईंच्या प्रॉपर्टीतही अचानक वाढ झाली. या सुनबाई आता अब्जाधीश बनल्या आहेत, असा दावा पाकिस्तानमधील वेबसाइट Fact Focus ने दावा केला आहे.

Fact Focus वर प्रकाशित वृत्तानुसार, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा मुलगा साद बाजवा याचं नुकतंच लग्न झालं. लाहौर येथील महनूर साबिर हिच्यासोबत 2 नोव्हेंबर रोजी हा विवाहसोहळा संपन्न झाला. मात्र लग्नापूर्वीच महनूर साबिर अचानक अब्जाधीश झाल्याचा दावा या वेबसाइटने केला आहे. तिच्या इतर तीन बहिणींच्या संपत्तीत मात्र काहीच वाढ झालेली नाही.

Fact Focus च्या दाव्यानुसार, महनूर साबिर हिचे साद बाजवासोबत लग्न होण्याच्या 9 दिवस आधी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी गुजरावाला येथे 8 डीएएच प्लॉटचा व्यवबार झाला. नियमानुसार, डीएएच यांनी अधिग्रहण केलेल्या जमिनीची मालकी मिळाल्यानंतर हे प्लॉट वितरीत करता येतात. वेबसाइटने आणखी एक दावा केलाय. 23 ऑक्टोबरलाच 2015 मधील एका बॅकडेटनुसार, महनूर एका कॉन्स्टिट्यूशन वन ग्रँड हयात अपार्टमेंटची मालकीण बनली.

जनरल बाजवा यांच्या कुटुंबियांनी महनूर साबिरचे वडील साबिर मिठू हमीद यांच्यासोबत जॉइंट बिझनेसदेखील सुरु केला. साबिर मिठू हमीद यांनी पाकिस्तानाच्या बाहेर भरपूर पैसे ट्रान्सफर केले असून विदेशात संपत्ती खरेदी केल्याचा दावाही या वेबसाइटने केला आहे.

फॅक्ट फोकस वेबसाइटच्या दाव्यानुसार, जनरल कमर जावेद बाजवा यांची पत्नीदेखील अचानक अब्जाधीश बनली. आयशा बाजवा यांनी गुलबर्ग ग्रीन्स इस्लामाबाद आमि कराचीतील मोठे फार्म हाऊस, लाहौरमधील अनेक प्लॉट, डीएचए स्कीम यातील कमर्शियल प्लॉट आणि प्लाझा खरेदी केले. तसेच डीएचए लाहौर येथील फेच चार आणि सहा येथे कमर्शिअल प्लाझाचा मालकीहक्क त्यांना मिळाल्याचं वेबसाइटने म्हटलं..

वेबसाइटने दावा केलाय की, जनरल बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नव्हते तेव्हा त्यांची पत्नी आयशा आयकरदेखील भरत नव्हत्या. त्या गृहिणी असल्याचं जाहिर केलं होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.