AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कपडे ओढले, लाथा घातल्या, नेपाळच्या अर्थमंत्र्याला गुरासारखं मारलं; हादरवून टाकणारा व्हिडीओ

Video Viral: सध्या सोशल मीडियावर नेपाळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री जीव मूठीत घेऊन आदोलकांपासून पळताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांचा हादरुन टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Video: कपडे ओढले, लाथा घातल्या, नेपाळच्या अर्थमंत्र्याला गुरासारखं मारलं; हादरवून टाकणारा व्हिडीओ
nepal-finance-ministerImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 09, 2025 | 6:01 PM
Share

भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये राजकीय भूकंप आला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजिनामा दिला आहे. त्याआधी तीन मंत्र्यांनी राजिनामा दिला होता. नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालणे ओली सरकारलं चांगलच भोवलं आहे. लाखो तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहे. या तरुणांनी काही मंत्र्यांच्या घरावर गोळीबार केला आहे तर काही मंत्र्यांची घरे पेटवली आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलक तरुणांनी मारहाण केल्याचे दिसत आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल रस्त्यावर दिसत आहेत. अनेक आंदोलक हे विष्णू पौडेल यांच्या अंगावर धावून गेले आहेत. काहींनी त्यांचे कपडे ओढले तर काहींनी लाथा बुंग्या मारल्या आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की विष्णू पौडेल हे जीव मूठीत घेऊन आंदोलकांपासून पळत आहेत. पुढे ते आंदोलकांच्या हाती लागले ही तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाचा: मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला…; लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र

चार नेत्यांनी दिला राजिनामा

तरुणांच्या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार चांगलेच हादरले आहे. पहिले गृहमंत्री रमेश लेखक, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल आणि जल मंत्री प्रदीप यादव यांनी मंत्री पदाचा राजिनामा दिला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी देखील राजिनामा दिला. यावरून स्पष्ट होते की आंदोलकांचा दबाव आता सरकारला सांभाळणे शक्य राहिले नाही.

कोण आहेत विष्णू पौडेल

विष्णू पौडेल हे नेपाळचे मोठे नेते आहेत. ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल)चे उपाध्यक्ष आहेत. पौडेल यांनी अलीकडेच तृतीय दहल मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. यापूर्वीही त्यांनी अनेकदा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये ते उपपंतप्रधान होते आणि त्यांनी गृहमंत्रालय, उद्योग मंत्रालय, जल मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली आहे. अर्थमंत्रालयाची जबाबदारी त्यांनी दोनदा (2020-21 आणि 2015-16) सांभाळली आहे. जल मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी 1994-99, 2008-09 आणि 2021 मध्येही पार पाडली होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.