मोठी बातमी! अमेरिकेच्या 6 बॉम्बर्स विमानांचं तो सर्वात खतरनाक बॉम्ब घेऊन उड्डाण; इराण दहशतीखाली
इस्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये अमेरिकेकडून सातत्यानं इस्रायलची बाजू घेतली जात असून, इराणला धमकावण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये अमेरिकेकडून सातत्यानं इस्रायलची बाजू घेतली जात असून, इराणला धमकावण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एका मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेच्या सर्वात धोकादायक बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी अचानक उड्डाण केलं आहे. फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल संभाषणानुसार अमेरिकेच्या बी-2 स्टेल्थच्या सहा बॉम्बर्सनी मिसूरीमधील व्हाईटमन एअर फोर्स बेसवरून उड्डाण केलं आहे. हे सहाही बॉम्बर्स अमेरिकेच्या गुआममधील एअर बेसकडे झेपावले आहेत. या विमानांद्वारे इराणच्या अत्यंत सुरक्षित अणू स्थळांवर हल्ला करण्याचं अमेरिकेचं नियोज असू शकतं अशी भीती व्यक्ती केली जात आहे. अमेरिकेच्या वाढत असलेल्या हालचालींमुळे रशिया आणि चीनची अस्वस्था वाढली आहे.
अमेरिकेच्या 6 बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी उड्डान केलं आहे. हे विमानं दोन टन वजनांच्या बंकर बस्टर बॉम्बने भरलेले असू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे तंत्रज्ञान केवळ अमेरिकेकडेच आहे. हे तंत्रज्ञान जमिनीच्या कितीही आत लपलेले अड्डे नष्ट करण्यास सक्षम आहे.
काय आहेत बंकर बस्टर बॉम्ब?
JINSA चे परराष्ट्र धोरण संचालक जोनाथन यांनी याबाबत एका वृत्त वाहिनीला माहिती देताना सांगितले की, हे असं तंत्रज्ञान आहे, ज्याचा जमिनीवर मारा केल्यानंतर हे जमिनीचा कितीही कठीण थर भेदून आत प्रवेश करते, हे बॉम्ब एवढे शक्तिशाली असतात की जमिनीमध्ये कितीही खोलवर असलेले अड्डे या बॉम्बेमुळे नष्ट केले जाऊ शकतात. या बॉम्बचा हल्ला झाल्यास त्या परिसरातील जमीन देखील हादरते, तेथील इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता देखील असते.
अमेरिकेकडून दबावाचा प्रयत्न
दरम्यान अमेरिकेकडून सातत्यानं इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र इराण देखील अमेरिकेच्या दबावाला बळी पडत नसल्याचं दिसून येत आहे, त्यांचे देखील इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धात इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
