इंग्लंड मोठ्या संकटानं हादरलं, रात्री दीडच्या सुमारास संपूर्ण देशात इमर्जन्सीची घोषणा, नागरिक मुठीत जीव घेऊन पळत सुटले

ब्रिटनमध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक इमर्जन्सी लागू करण्यात आली, इमर्जन्सी लागू करण्यात आल्यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला, दरम्यान अजूनही धोका कायम असून, संकट अद्याप टळलेलं नाहीये.

इंग्लंड मोठ्या संकटानं हादरलं, रात्री दीडच्या सुमारास संपूर्ण देशात इमर्जन्सीची घोषणा, नागरिक मुठीत जीव घेऊन पळत सुटले
इंग्लंडमध्ये पूर संकट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2025 | 5:40 PM

ब्रिटनमधे रात्री दिडच्या सुमारास अचानक आणीबाणी लागू करण्यात आली, यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पर्यावरण एजन्सीकडून अलर्ट देण्यात आला होता, या अलर्टच्या पार्श्वभूमीवर देशात इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. सध्या वातावरण शांत आहे,
मात्र अजूनही ब्रिटनमधील धोका टळलेला नाहीये, क्लॉडिया वादळानंतर आता देशाच्या अनेक भागांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे इंग्लंडमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत इंग्लंडमध्ये 58 पेक्षा अधिक पुरांचा इशारा तसेच 150 हून अधिक पूर सूचना तेथील सरकारकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अजूनही धोका टळलेला नसून, अनेक नद्यांची पाणीपातळी ही अजूनही कमी झालेली नाही, त्यामुळे देशात काही ठिकाणी पुन्हा पूर येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ब्रिटनला पुराचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत वीसपेक्षा अधिक घरं ही पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत, तर तब्ब 12000 कुटुंबांचं या पुराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. इंग्लंडमध्ये पुराचा मोठा फटका बसला असून, प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे नद्यांना येऊन गेलेल्या पुरानंतर आता देशात युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. बचाव यंत्रणेकडून पावसामुळे आणि पुरांच्या तडाख्यामुळे कोसळलेल्या घरांचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान याबाबत बोलताना फ्लड ड्यूटी मॅनेजर असलेल्या कुटबर्टसन यांनी म्हटलं की, आम्ही अशा सर्व लोकांच्या पाठीशी आहोत, ज्यांनी या पुरामध्ये आपलं घर गमावलं आहे, जे बेघर झाले आहेत, पूर येण्याच्या आधीच अलर्ट दिल्यामुळे मोठं नुकसान टळलं आहे, मात्र देशाच्या अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

अतिमुसळधार पावसामुळे इंग्लंडमध्ये हाहाकर उडाला आहे, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, दरम्यान नद्यांना आलेला पूर अजूनही ओसरलेला नसल्यामुळे बचाव कार्यात देखील अडचणी येत आहेत, ब्रिटनच्या पर्यावरण एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस तरी नद्यांना पूर कायम राहणार आहे.