Sunita Williams : मी चालणंच विसरले होते… 9 महिने अंतराळात घालवून पृथ्वीवर परतल्यावर कशी होती स्थिती ? सुनिता विल्यम्स यांचा मोठा खुलासा
२७ वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी निवृत्ती घेतली आहे. बोईंग स्टारलाइनरच्या बिघाडामुळे अंतराळात ९ महिने अडकल्याचा, मानसिक संघर्षाचा अनुभव त्यांनी सांगितला. गुरुत्वाकर्षण नसल्याने चालणं विसरल्याचंही त्यांनी नमूद केलं. कल्पना चावला यांच्या कुटुंबासोबतचे भावनिक नाते आणि त्यांच्या टॅटूमागची कहाणीही त्यांनी उघड केली.

27 वर्षांचं शानदार करिअर आणि अंतराळात 608 दिवस राहण्याचा रेकॉर्ड बनवणाऱ्या कॅप्टन सुनिता विल्यम्स (Sunita Williams) या आता अंतराळवीर म्हणून वावरणार नाहीत, त्यांनी नुकीतच निवृत्तीची घोषणा केली. एका मुलाखतीत, त्यांनी बोईंग स्टारलाइनरच्या तांत्रिक बिघाडामुळे अंतराळ स्थानकावर घालवलेल्या 9 महिन्यांतील त्यांच्या संघर्षाची, एकाकीपणाची आणि मानसिक स्थितीची खुलेपणाने चर्चा केली. बराच काळ गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्यामुळे, पृथ्वीवर परतल्यानंतर आपण चालणंच विसरले होतो, मला पुन्हा चालायला शिकावं लागलं असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवला होता, त्याबद्दल त्या बोलल्या. तसेच त्यांच्या टॅटूमागची कहाणीही त्यांनी सांगितली.
अवघ्या काही दिवसांसाठी अतंराळात गेलेल्या सुनिता विल्यम्स यांना तब्बल 9 महिने तिथे अडकून पडावं लागलं. त्यावेळी भावनिक वेदना त्यांनी शेअर केली.तिथे सर्व शारिरीक सुरक्षितता होती. मात्र त्या मुक्कामादर्यमानचा सर्वात कठीण भाग होता, तो म्हणजे घरी परतण्याची अनिश्चितता. बराच वेळ पृथ्वीपासून दूर राहिल्यामुळे गुरुत्वाकर्षणाशी संबंध आला नाही. त्यामुळेच मी बसणं आणि झोपणं विसरले होते. एवढंच नव्हे तर पृथ्वीवर परत आल्यावर चालायचं कसं, हेही पुन्हा शिकावं लागल्याचं त्यांनी नमूद केलं.
टॅटूमागची कहाणी काय ?
नासातील कामगिरीव्यतिरिक्त, सुनीता या स्वतःला नौदलाची हेलिकॉप्टर पायलट आणि प्राणीप्रेमी मानतात. आपल्या शरीरावरील टॅटूमागची कहाणीही त्यांनी सांगितली. तिचा दिवंगत जॅक रसेल टेरियर कुत्र्याच्या स्मरणार्थ हा टॅटू काढण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. प्राणी खरे आणि पवित्र असतात. माणसांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे असंही त्या मानतात.
कल्पना चावलाच्या आईसह घालवला वेळ
या मुलाखतीदरम्यान, सुनीता यांनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्याशी असलेल्या त्यांच्या खोल नात्याबद्दल सांगितले. 2003 च्या कोलंबिया दुर्घटनेनंतर सुनिता या कल्पना चावला यांच्या कुटुंबासोबत तीन महिने राहिल्या होत्या, त्यांनीच हे उघड केलं. कल्पनाची आई खूप अद्भुत होती आणि कुटुंबासह तिच्या आठवणींना उजाळा देणं हे समाधानकारक होतं. नासा नेहमीच कल्पनाचा वारसा पुढे नेईल याचीही तिने कुटुंबियांना खात्री दिली.
