डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत वाईट बातमी, थेट मोठा धक्का, भारतासोबत पंगा घेणे पडले महागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ 50 टक्के लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेताना सध्या डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. फक्त भारतच नाही तर अमेरिकेतूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली येणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आलाय. फक्त भारत आणि इतरच देश नाही तर सर्वच स्तरातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय. अमेरिकेतील लोकांना देखील टॅरिफचा निर्णय अजिबात आवडला नाहीये. काही कंपन्यांनी तर यावर थेट भाष्य केलंय. अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ कर लादण्यात आलाय. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट होऊ शकतो.
अमेरिकेच्या दबावा पुढे भारत झुकणार नाही, हे तर अगदी स्पष्ट आहे. आता अमेरिकेचे माजी उप-परराष्ट्रमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी सीएनबीसी इंटरनॅशनलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत भारतावर ज्यापद्धतीने कर लादण्यात आला त्याचा निषेध केला. त्यांचे म्हणणे आहे की, या करामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध धोक्यात येऊ शकतात. यापूर्वी भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आहेत.
कॅम्पबेल यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, 21 व्या शतकात अमेरिकेचे भारताशी महत्त्वाचे अत्यंत संबंध आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार हे संबंध धोक्यात आले आहेत आणि भविष्यात हे बिघडू शकतात. ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल ज्या पद्धतीने भाष्य केले, त्यामुळे भारत सरकार मुळात अडचणीत आले आहे. कॅम्पबेल यांनी भारताला मोठा सल्ला विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या यांच्या अटी मान्य करू नयेत.
पुढे बोलताना कॅम्पबेल यांनी म्हटले की, रशियासोबतच्या संबंधांवरून भारतावर अमेरिकेचा दबाव उलटा परिणाम करू शकतो. जर तुम्ही भारताला सांगितले की, रशियासोबतचे संबंध तोडा तर भारतीय रणनीतीकार अगदी उलट करतील असेही त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे ज्यापद्धतीने भारताबद्दल निर्णय घेत आहेत, त्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहेत. मुळात म्हणजे भारताचे रशियासोबत असलेले चांगले संबंध हीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी पोटदुखी आहे.
