अमेरिका आणि चीनवर भरोसा करूच शकत नाही… जबरदस्त धक्का, थेट भारतात येऊन..

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो भारत दाैऱ्यावर आहेत. फ्रान्स आणि भारताचे नाते अत्यंत मजबूत आहेत. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला. मात्र, टांगती तलवार भारतावर कायम ठेवली आहे. त्यामध्येच आता मोठ्या घडामोडी पुढे येत आहेत.

अमेरिका आणि चीनवर भरोसा करूच शकत नाही... जबरदस्त धक्का, थेट भारतात येऊन..
America and China
| Updated on: Feb 19, 2026 | 8:39 AM

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अत्यंत महत्वाचे करार फ्रान्स आणि भारतात होत आहेत. मुळात म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारी आजची नाही तर अनेक दशकांपासून आहे. इमॅनुएल मॅक्रो यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या. फ्रान्सकडून भारताला संरक्षण क्षेत्रात मोठा ताकद मिळाली आहे. राफेल फायटर जेट्ससारखी ताकद फ्रान्सनेच भारताला दिली आहे. अमेरिकेने भारतावरील 50 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्के केला आहे. यासोबतच व्यापार करार झाली असून त्यावर तांत्रिक काम सुरू आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने थेट अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली. युरोपियन युनियनसोबतही भारताने करार केला. अमेरिकेने भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही.

अमेरिका सध्या भारताबद्दल सकारात्मक भूमिका घेत आहे. भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. पण भारतावरील टॅरिफ कमी करतानाच अमेरिकेने मोठी अट ठेवली. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली तर आम्ही भारतावर पुन्हा टॅरिफ लावू, अशी थेट धमकीच अमेरिकेने दिली.

आता थेट इमॅनुएल मॅक्रो यांनी भारतात आल्यानंतर स्पष्ट शब्दात म्हटले की, अमेरिका आणि चीनवर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेऊ शकत नाहीत. इमॅनुएल मॅक्रो यांचे हे विधान भारतीय लोकांना प्रचंड आवडले असून त्यांनी भारतीयांचे मन जिंकले. अमेरिकेवर आणि चीनवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. अमेरिका आणि भारतात चांगले संबंध होते. मात्र, तरीही टॅरिफच्या मुद्द्यात भारतावर अनेक निर्बंध अमेरिकेने लावले.

इमॅनुएल मॅक्रो यांनी म्हटले की, भारत आणि फ्रान्सने आता अमेरिकी आणि चीनी मॉडलवर अवंलबून राहिले नाही पाहिजे. त्यांनी पुढे म्हटले की, मला वाढते की, भारत आणि फ्रान्समध्ये एक शक्ती आणि करण्याची मोठी ताकद आहे. त्यामध्ये हे देखील आहे की, आपण अमेरिका आणि चीनच्या मॉडेलवर अवलंबून राहतो. ते नाही केले पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us