पाकिस्तानचं कराची शहर बेचिराख होणार? पृथ्वीच्या पोटात घडतंय भयंकर, नेमकं काय होतंय?
संपूर्ण पाकिस्तान सध्या चिंताग्रस्त झालं आहे. इथं कराचीमध्ये काहीतरी अवचित घडतं की काय? असं प्रत्येकाला वाटत आहे.

Pakistan Karachi Earthquake : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान अगोदरच भेदरला आहे. दुसरीकडे बलुचिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून उदयास यावा यासाठी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या संघनटेनेही पाकिस्तानच्या नाकी नऊ केले आहेत. असे असतानाच आता निर्सगही पाकिस्तावर कोपला आहे. येथे पाकिस्तानचे कराची हे महत्त्वाचे शहर भूकंपाने व्यापलं आहे. त्यामुळे या शहरातील नागरिक पुरते घाबरले असून नेमकं काय होणार? अशी चिंता पाकिस्तानला लागली आहे.
भूकंपांची संख्या 48 वर गेली
मिळालेल्या माहितीनुसार 2 जून 2025 रोजी 24 तासांत कराचीमध्ये एकूण तीन भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर 48 तासांमध्ये भूकंपांची ही संख्या तब्बल 48 वर गेली. हे सर्व धक्के मध्यम ते सौम्य स्वरुपाचे होते. कराचीतील याच स्थितीमुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.
कराचीत 2 जून रोजी काय घडलं?
पाकिस्तानच्या कराचीमधील कायदाबादमध्ये सकाळी 3.2 वाजता भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्याआधी रविवारीही (1 जून) सकाळी 5.33 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाचे धक्के खोखरापार, मलीर, लांढी, फ्युचर मोर, गुल अहमद इथपर्यंत जाणवला होता.
48 तासांत तब्बल 21 भूकंपाचे धक्के
कराचीत 1 ते 2 जून या काळात 2.1 ते 3.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे एकूण 21 भूकंपाचे धक्के जाणवले. यापैकी सर्वाधिक मोठा धक्का हा 3.6 रिश्टर स्केलचा होता.
याआधी काय घडलं होतं?
फेब्रुवारी 2025 मध्येही कराची शहरात भूकंपाचे 20 धक्के बसले होते. मे 2025 मध्ये 4.2 ते 4.9 रिश्टर स्केलच्या एकूण सात भूकपांची नोंद करण्यात आली होती. एप्रिल 2024 मध्ये मलीर या भागात 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्र भूगर्भात 12 किलोमीटर खोल होते. आतापर्यंत कराचीमध्ये झालेल्या या भूकंपांमुळे अद्याप मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र जमिनीत सातत्याने होणाऱ्या या भूकंपांमुळे कराचीतील नागरिक चिंतेत आहेत.
कराचीत वारंवार भूकंप का होतो?
कराचीत गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंप का होतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्यामागे अनेक कारणं आहेत. यातली काही कारणं ही नैसर्गिक तर काही कारणं ही मानविर्मित आहेत. कराचीमध्ये पृथ्वीच्या पोटात टेक्टोनिक प्लेट्समध्ये मोठ्या हालचाली होत असतात. कराची हे शहर अरबी समुद्राच्या किनारी आहे. तिथे अरेबियन प्लेट आणि युरेशीयन प्लेट एकमेकांशी घासत आहेत, त्यामुळेही भूकंपाचे धक्के बसत आहेत.
