फोन कॉल्सपासून ते रोबोटिक मशीन गनपर्यंत, इस्रायल तंत्रज्ञानाद्वारे कसे करतो शत्रूंंना लक्ष्य?
लेबनॉनमध्ये प्रथम पेजरमध्ये आणि नंतर वॉकी-टॉकीसारख्या काही उपकरणांमध्ये स्फोट झाल्यानंतर या स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 3500 लोक जखमी झाले आहेत. या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचे बोलले जात आहे, जो छोट्या वस्तूंचे शस्त्रांमध्ये रूपांतर करण्यात जगात आघाडीवर आहे.
जगाच्या अनेक भागात सध्या संघर्ष सुरू आहे. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. हिजबुल्लासारख्या अनेक प्रॉक्सी नेटवर्कनेही या युद्धात भाग घेतला होता. लेबनॉनमधील या संघटनेने युद्ध सुरू झाल्यापासून इस्त्रायली भागात सातत्याने रॉकेट हल्ले केले आहेत. मात्र, या संघर्षात गेल्या दोन दिवसांत जे काही घडले त्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. लेबनॉनमध्ये मंगळवारी सीरियल पेजर बॉम्बस्फोट झाले ज्यात तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले. बुधवारीही हाच ट्रेंड कायम राहिला आणि यावेळी वॉकीटॉकीमध्ये स्फोट झाले ज्यात शेकडो लोक जखमी झाले.
या स्फोटांमागे अवलंबलेल्या रणनीतीमुळे संपूर्ण जग चिंतेत असताना इस्रायलने याला युद्धाचा नवा प्रकार म्हटले आहे. दरम्यान, पेजर आणि वॉकीटॉकीनंतर शत्रूला लक्ष्य करण्यासाठी इतर उपकरणांचाही वापर केला जाऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लेबनॉनमध्ये बुधवारी वॉकी-टॉकीसारख्या काही उपकरणांमध्ये स्फोट झाले. ज्यात 9 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. एपी वृत्तसंस्थेनुसार, बेरूतमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक स्फोट ऐकू आले आणि पेजरच्या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला.
आधी काय झालं?
पेजर हल्ल्याच्या एका दिवसापूर्वी विशेषतः बेरूतच्या दक्षिणी उपनगरांना लक्ष्य केले होते, दाट लोकवस्ती असलेला भाग हिजबुल्लाचा गड मानला जातो. स्फोटानंतर दुकानदार आणि रस्त्यावरून चालणारे लोक खाली पडले. या हल्ल्यांमध्ये एका लहान मुलासह किमान नऊ लोक ठार झाले आणि सुमारे 3,000 जखमी झाले. स्फोटांमुळे लेबनॉनच्या रुग्णालयांमध्ये गोंधळ उडाला.
लेबनीजची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील दाहिया आणि पूर्वेकडील बेका खोऱ्यात दुपारी साडेतीन वाजता (स्थानिक वेळेनुसार) स्फोट सुरू झाले. हे स्फोट काही सेकंद किंवा मिनिटे नसून सुमारे तासभर सुरू होते. वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रत्यक्षदर्शी आणि दहिया येथील रहिवाशांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दुपारी साडेचार वाजताही त्यांना स्फोटांचे आवाज ऐकू आले. पेजर लावल्यानंतर काही स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. पेजर वाजत असताना, हिजबुल्लाहच्या सैनिकांनी पेजरवर हात ठेवले किंवा स्क्रीन पाहण्यासाठी त्यांना त्यांच्या चेहऱ्याजवळ आणले. यावेळी पेजर फुटले. अशाप्रकारे, दोन दिवसांत, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या हजारो पेजर आणि वॉकी-टॉकी रेडिओच्या स्फोटात किमान 19 लोक मारले गेले आणि हजारो लोक जखमी झाले.