
अमेरिका सध्या खूप चिंतेत आहे. याचे कारण असा खतरनाक बॉम्ब, जो फुटलाच नाही आणि आता हा बॉम्ब चुकीच्या हातात जाण्याचा धोका वाढला आहे. लेबनॉनच्या हेजबुल्लाह असणाऱ्या भागात इस्राईलने स्ट्राईक दरम्यान एका अमेरिकन बॉम्बचा वापर केला होता. पण हा GBU-39B स्मॉल डायमीटर बॉम्ब (SDB) फुटलाच नाही. आणि बातम्यानुसार हा बॉम्ब सुरक्षितपणे इराण सापडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे इराण त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे कॉपी करण्यात जर यशस्वी झाला तर अमेरिकेची डोकेदुखी वाढणार आहे.
जर कोणी विचार करत असेल की इराण इतकी हाय टेक अमेरिकन टेक्नॉलॉजीला समजू शकणार नाही तर तो चुकीचा आहे. जूनमध्ये आलेल्या एका बातमीनुसार जेव्हा इस्राईलने इराणमध्ये ‘हर्मीस’ आणि FPV ड्रोनने हल्ला केला होता. त्यातील अनेक ड्रोन नष्ट झाले नव्हते. इराणने त्या ड्रोनना ताब्यात घेतले. आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे तसाच कॉपी करुन नवा ड्रोन तयार केला होता. आणि इराणचा हा नवा ड्रोन आता मूळ ड्रोनपेक्षा अधिक घातक म्हटला जात आहे. इराणने आधीही अमेरिकेच्या RQ-170 स्टेल्थ ड्रोनला कॉपी करुन स्टेल्थ ड्रोन बनवला आहे.
त्यामुळेच जर हा GBU-39B बॉम्ब इराणच्या जवळ पोहचला तर तो त्याला ब्लुप्रिंट समजून त्याच प्रकारे स्मार्ट, लांबपल्ल्याचे, GPS-गायडेड मूनिशन तयार करु शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेने लेबनॉन सरकारशी तात्काळ संपर्क करुन या न फुटलेल्या बॉम्बला पुन्हा परत मागितले आहे. अमेरिकेला हे म्युनिशन इराणपर्यंत पोहचेल केवळ हीच भीती नाही,तर चीन वा रशिया देखील याची रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे कॉपी करु शकतो अशीही भीती आहे. लेबनॉनच्या बातमीनुसार GBU-39B हा इस्राईलच्या त्या स्ट्राईकचा भाग होता. ज्यात हेजबोल्लाहचा गड हरात ह्रॅकला टार्गेट करण्यात आले होते. एक बॉम्ब फुटला नाही आणि त्याचे संपूर्ण सिस्टीम गायडन्स युनिट, GPS मॉड्यूल, इलेक्ट्रॉनिक्स जसेच्या तसे सापडले आहे.
हा एक 113 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब असून तांत्रिकदृष्ट्या खूपच उन्नत आहे. यात असे गायडन्स सिस्टीम आहेत जे हवामान किंवा धुराने प्रभावित होत नाही. आणि 40 नॉटिकल मैल दूरपर्यंत अचूकतेने टार्गेट नष्ट करु शकतो.हे तंत्रज्ञान अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराण वा त्यांच्या सहकाऱ्यापर्यंत पोहचू नये अशी अमेरिकेची इच्छा आहे. तर हा बॉम्ब इराणला मिळाला तर तो यास खोलून त्याच्या प्रत्येक पार्टची इंजिनिअरिंग समजू शकतो. आणि आपली मिसाईल आणि ड्रोन क्षमता अधिक पटीने वाढवू शकतो. इराणची ही क्षमता केवल अंदाज नसून अनेकदा सिद्ध झाली आहे. लेबनॉन सरकारने आतापर्यंत हा बॉम्ब त्यांच्याकडे आहे की नाही ते स्पष्ट केलेले नाही. तसेच तो अमेरिकेची विनंती कशी हँडल करणार हे त्याने स्पष्ट केलेले नाही.