AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पहिल्यांदाच इस्राईलचे मोठे ऑपरेशन, संपूर्ण जग झाले हैराण…

इस्राईलवर हमासच्या अतिरेक्यांनी साल २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात हल्ला केला होता. त्यानंतर दोन वर्ष हमासशी इस्राईलचे युद्ध सुरु आहे. या युद्धात आता गाझापट्टीची धुळधाण झाली आहे. आता इस्राईलने एक नविन ऑपरेशन भारतात सुरु केले आहे.

भारतात पहिल्यांदाच इस्राईलचे मोठे ऑपरेशन, संपूर्ण जग झाले हैराण...
NETANYAHU
| Updated on: Nov 28, 2025 | 5:10 PM
Share

इस्रायलने गाझापट्टीतील कारवाई थांबवलेली नाही. आतापर्यंत गाझापट्टीतील ६० हजार लोकांचे या युद्धात मृत्यू झाले आहेत. त्यात आता इस्राईलने भारताच्या मदतीने एक असे ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे जगाला धक्का बसला आहे. या ऑपरेशन संदर्भात इस्राईलच्या संसदेने एक प्रस्ताव देखील संमत केला आहे. इस्राईल गपचुपपणे भारतात राहणाऱ्या सुमारे ६००० लोकांना त्यांच्या देशात घेऊन चालला आहे.

हैराण करणारी गोष्ट म्हणजे भारतातून या सहा लोकांना इस्राईल कोणत्या नोकरीसाठी घेऊन चाललेला नाही. तर या लोकांना कायमस्वरुपी इस्राईलच्या एका खास भागात वसवण्यासाठी घेऊन चालला आहे. वास्तविक आपल्या देशाच्या सीमांना वाचवण्यासाठी इस्राईल या लोकांना त्यांच्या देशात घेऊन चालला आहे. या मोहिमेचा संपूर्ण खर्च देखील इस्राईलच उचलत आहे. हा खर्च जवळपास ९० मिलियन शेकेल म्हणजे भारतीय रुपयात २४० कोटी रुपये इतका आहे.

इस्राईलने भारताच्या पूर्वोत्तर राज्यात राहणाऱ्या  बिनई मिनाशे समुदायातील उरलेल्या ५,८०० ज्यूंना त्यांच्या देशात वसवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व लोकांना हळूहळू पाच वर्षांत इस्राईलमध्ये वसवले जाणार आहे. यातील १२०० लोकांना साल २०२६ मध्ये वसवण्यासाठी आधीच मंजूरी घेण्यात आली आहे. बिनई मिनाशे हे ते लोक आहेत ज्यांचे जवळचे नातेवाईक आधीच इस्राईलमध्ये वसले आहेत. इस्राईलचे धार्मिक गुरु श्लोमोअमार यांनी या समुदाला इस्राईल मूळ असलेल्या लोकांची मान्यता देखील दिली आहे.

भारताने काश्मीरात हे केले तर…

समजा भारत सरकार जर पाकिस्तानच्या लगत असलेल्या काश्मीरात हिंदूंची संख्या वाढवू लागला. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूना कश्मीरात वसवू लागला तर अशा स्थितीत तेच होईल जे इस्राईलने या ऑपरेशनद्वारे सुरु केले आहे. इस्राईलची इच्छा आहे की त्यांच्या सीमाभागात ज्यूंचे वर्चस्व राहावे. हे यासाठी गरजेचे आहे की सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या इस्राईली सैनिकांना या ज्यूंची मदत मिळत राहील. जर पॅलेस्टाईन लोकांची संख्या वाढली तर ते इस्राईली सैनिकांनाच नष्ट करण्याच्या मागे लागतील आणि इस्राईलशी गद्दारी करती. आता भारताच्या बिनई मिनाशे समुदायाला भेटण्यासाठी ज्यू धर्म गुरुंची आता पर्यंतची सर्वात मोठी टीम भारतात येत आहे.ही टीम भारताच्या पूर्वोत्तरात भागात राहाणाऱ्या बिनेई मिनाश समुदायाच्या लोकांना भेटणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.