नेपाळमधील सत्तांतरानंतर जनरेशन Z ची रंगली चर्चा, कोण आहेत आणि वय काय? ते जाणून घ्या

नेपाळमध्ये सत्तांतराला जनरेशन झेड कारणीभूत ठरलं आहे. सरकारच्या टोकाच्या भूमिकेनंतर आंदोलनाला धार मिळाली आणि सत्तांतर घडलं. त्यामुळे जनरेशन झेडची चर्चा आता रंगू लागली आहे. नेमकं या जनरेशनमध्ये काय घडलं की इतका उद्रेक झाला ते समजून घेऊयात.

नेपाळमधील सत्तांतरानंतर जनरेशन Z ची रंगली चर्चा, कोण आहेत आणि वय काय? ते जाणून घ्या
नेपाळमधील सत्तांतरानंतर जनरेशन Z ची रंगली चर्चा, कोण आहेत आणि वय काय? ते जाणून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 09, 2025 | 7:42 PM

नेपाळ सरकारचा सोशल मीडिया वापरावर बंदीचा एक निर्णय सत्तांतरासाठी कारणीभूत ठरला. जनरेशन झेड या सत्तांतराचा केंद्रबिंदू ठरले. नेपाळमधील तरुणांच्या सरकारविरोधी निदर्शनांना हिंसक वळण लागले. देशात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला.जनरेशन झेड ही काय राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटना नाही. जनरेश झेड ही एक पिढी आहे. या पिढीला जनरेशन झेड असं नाव पडलं आहे. पण जनरेशन झेड कोणाला संबोधलं जातं? का असं संबोधलं जातं? त्याचं वय काय? वगैरे असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. जर तुम्हाला असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.

जनरेशन झेड म्हणजे काय?

जनरेशन झेड ही नवी पिढी असून ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या कालावधीत झाला आहे. म्हणजेच या 15 वर्षांच्या कालावधीत जन्माला आलेल्या पिढीला जनरेशन झेड संबोधलं जातं. या पिढीला डिजिटल नेटीव असंही संबोधलं जातं. कारण इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मिडिया या पिढीचा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. जन्मापासून इंटरनेट सुविधा असलेली पहिली पिढी आहे. त्यामुळे या पिढीला जनरेशन झेड म्हंटलं जातं. इतर पिढ्यांनी इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आधी आणि नंतर जीवन जगलं आहे. जनरेशन झेड पिढी सहज तंत्रज्ञानाचा वापर करते. ऑनलाईन शॉपिंगपासून ते वर्क फ्रॉम होममध्ये ही पिढी बरोबर बसते. ही पिढी आता कौटुंबिक तसंच जगाचा गाडा हाकण्यासाठी सक्षम झाली आहे. पण त्यांची वैचारिक शक्ती आणि सवयी समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहेत.

जनरेशन झेड खूप विचार करते. नोकरीची अनिश्चितता आणि घर खरेदीचा वाढत्या खर्चामुळे त्रस्त आहेत. 18 ते 35 वयोगटातील 61 टक्के तरुणांना पैशांची चिंता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी ही पिढी अतिरिक्त काम करण्याकडे भर देत आहे. भविष्याचं नियोजन करण्यात पटाईत आहे. एका सर्व्हेक्षणानुसार या पिढीतील दोन तृत्तीयांश लोकांनी सरासरी वयाच्या 19 व्या वर्षांपासून बचत करण्यास सुरुवात केली आहे.