बांगलादेश विमानतळावर सोन्याचं घबाड, शेकडो गोल्डन विटा पाहून अधिकारी चक्रावले, सोन्याची किंमत किती?

| Updated on: Feb 23, 2021 | 1:50 AM

बांगलादेशमध्ये आज (22 फेब्रुवारी) शाह अमानत विमानतळावर (Shah Amanat Internation Airport) एका विमानात सोन्याचं घबाड सापडलंय.

बांगलादेश विमानतळावर सोन्याचं घबाड, शेकडो गोल्डन विटा पाहून अधिकारी चक्रावले, सोन्याची किंमत किती?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

ढाका : बांगलादेशमध्ये आज (22 फेब्रुवारी) शाह अमानत विमानतळावर (Shah Amanat Internation Airport) एका विमानात सोन्याचं घबाड सापडलंय. शेकडो गोल्डन विटा पाहून कस्टमचे अधिकारीही चक्रावले. या 150 सोन्याच्या विटांची किंमत 8 कोटी 69 लाख रुपये इतकी आहे. कस्टम डिपार्टमेंटने (Custom Department) दिलेल्या माहितीनुसार, सोनं जप्त करण्यात आलं ते विमान अबूधाबी (Abu Dhabi) येथून परतलं होतं. बांगलादेशच्या या विमानाचं (Bangladesh Aircraft) नाव बीजी-128 आहे. त्यात 17.4 किलोग्रॅम सोन्याच्या विटा सापडल्या (Golden bricks of 8 Crore 69 lakh were seized at shah amanat airport Bangladesh).

मागील काही काळात झालेल्या सोन्याच्या तस्करीमध्ये या कारवाईतील सोन्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आम्ही 150 विटा जप्त केल्या आहेत. त्यांचं वजन 17.4 किलोग्रॅम आहे. विमानाक काही सीटच्या वर एसी पॅनलची तपासणी केली असता तिथं हे सोनं सापडलं.

बांगलादेशमध्ये सोन्याची किंमत वाढल्याने तस्करीतही वाढ

मागील काही दिवसात बांगलादेशमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचमुळे बाहेर देशातून बांगलादेशमध्ये सोन्याची तस्करी होण्याच्या घटना घडत आहेत. बांगलादेश प्रशासन देखील सोन्याच्या तस्करीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचाच भाग म्हणून ढाका आणि चत्ताग्राम एअरपोर्टवर या प्रकारची कारवाई करण्यात आली.

BSF कडून 3.7 लाखांची सिगारेट तस्करीवर कारवाई

याआधी भारत बांगलादेश सीमेवर बीएसएफने अशाच एका तस्करीवर कारवाई केली. या तस्करीत 3.7 लाखांचे सिगारेट जप्त करण्यात आले होते. बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरने बंगालच्या नदिया जिल्ह्यात ही कारवाई केली. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे अकरा वाजता काही लोक नजर चुकवून संशयास्पद हालचाली करताना आढळले. ते लपवत लपवत प्लास्टिक बॅगमधून काही तरी चालले होते. यानंतर बीएसएफच्या तुकडीने अलर्ट जारी केला. तो ऐकून तस्कर पळाले.

जवानांना आरोपींचा पाठलाग करताना दोन बॅग सापडल्या. यात ईएसएसई ब्रँडच्या सिगारेटचे 450 पॅकेट होते. तसेच लुवीन ब्रँडचे 2900 पॅकेट सिगारेट जप्त करण्यात आले. या सर्वांची किंमत 3,07,500 रुपये आहे.

हेही वाचा :

पाकिस्तानची बर्बादीकडे वाटचाल तर बांग्लादेशची श्रीमंतीकडे, असं का घडतंय? वाचा सविस्तर

बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर

खून नवी मुंबईत, आरोपी बांगलादेशात, तरीही मुसक्या आवळल्या, कशा?

व्हिडीओ पाहा :

Golden bricks of 8 Crore 69 lakh were seized at shah amanat airport Bangladesh