Strait Of Hormuz : भारतासाठी GOOD NEWS, यापुढे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करुन ठेवलं म्हणून काही फरक पडणार नाही कारण..

Strait Of Hormuz : इराणने आपल्या युद्धनितीचा भाग म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करुन ठेवलं आहे. या मार्गावरुन होणारी तेल वाहतूक रोखून धरली आहे. परिणामी अमेरिका आणि इस्रायलवर युद्ध लवकरात लवकर संपवण्याचा दबाव वाढला आहे. मात्र, आता इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करुनही काही वाकड करु शकणार नाही. का ते जाणून घ्या?

Strait Of Hormuz : भारतासाठी GOOD NEWS, यापुढे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज  बंद करुन ठेवलं म्हणून काही फरक पडणार नाही कारण..
New Oil Route
Image Credit source: NASA
| Updated on: Apr 02, 2026 | 11:29 AM

इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक जवळपास ठप्प करुन ठेवली आहे. हॉर्मुज आणि लाल सागर समुद्री मार्गावर मोठा तणाव आहे. या दरम्यान जहाज मालकांनी सप्लायचा नवीन मार्ग शोधला आहे. हा मार्ग Cape Of Good Hope चा आहे. मागच्या काही दिवसात या समुद्री मार्गावर तेल आणि मालवाहू जहाजांची गर्दी दिसून आलीय. हा मार्ग अटलांटिक महासागर आणि हिंद महासागराच्या दरम्यान आहे. केप ऑफ गुड होप हा समुद्री मार्ग यासाठी महत्वाचा मानला जातो कारण याद्वारे मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि आशियापर्यंत सहजतेने पोहोचता येतं. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या जहाजांना इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी दहशतवादी संघटनांकडून कोणताही धोका नाही.

न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार केप ऑफ गुड होप मार्गावर ताण वाढला आहे. या मार्गावरुन दरदिवशी सरासरी 150 मालवाहू जहाजांची वाहतूक सुरु असल्याची माहिती आहे. अन्य दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्के जास्त आहे. जून 2025 मध्ये सुद्धा इराण-इस्रायल, अमेरिकेत युद्ध झालं होतं. तेव्हापासूनच केप ऑफ गुड होप समुद्री मार्गावरुन जलवाहतुकीच प्रमाण वाढलं आहे. इंधन पुरवठ्याच्या दृष्टीने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आणि अल-मंडेब महत्वाचे मार्ग मानले जातात.फारसची खाडी आणि ओमान खाडीच्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आहे. बाब अल-मंडेब लाल सागराजवळ आहे. या दोन्ही समुद्री मार्गावरुन जगभरात जवळपास 30 टक्के ऊर्जा पुरवठा होतो.

अल-मंडेब समुद्री मार्गावर तणावाचं कारण काय?

एकट्या हॉर्मुजमधून दरदिवशी 150 पेक्षा जास्त जहाजांची ये-जा चालते. पण सध्या ही संख्या कमी झाली आहे. आता इराणची संमती असलेल्या जहाजांनाच हॉर्मुजमधून जाण्याची परवानगी मिळत आहे. हुती बंडखोरांच्या युद्धातील एन्ट्रीमुळे अल-मंडेब समुद्री मार्गावर तणाव निर्माण झाला आहे. या मार्गावरुन संपूर्ण जगाचा 10 टक्के तेल पुरवठा होतो.

केप ऑफ गुड होपचा मार्ग काय आहे?

केप ऑफ गुड होप याच समुद्री मार्गावरुन 1498 साली प्रथम वास्कोदिगामा भारतात आला होता. भूमध्यसागर, अटलांटिक सागर, लाल सागर आणि ओमानच्या खाडीत असलेलं कुठलही जहाज सहज केप ऑफ गुड होपमध्ये प्रवेश करु शकतं. या मार्गावरुन अरबी समुद्रातून सहज जहाज भारतात येऊ शकतं. पण या मार्गावरुन जहाज काढणं थोडं खर्चिक आहे.

केपटाउन येथील समुद्री अर्थशास्त्री ब्रायन इंग्पेन यांनी न्यू यॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितलं की, दक्षिण अफ्रीकेच्या मार्गावरुन होणारी समुद्री वाहतूक जवळपास दुप्पट होऊ शकते. जहाजांना यासाठी जास्त खर्च करावा लागेल. त्यांनी समुद्री शुल्क, बंदर शुल्क त्याशिवाय स्टाफ आणि अन्य गरजेच्या सामानावर खर्च करावा लागेल.

इंग्पेन यांच्यानुसार हा खर्च 30 ते 70 टक्क्याने वाढू शकतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गासंबंधी लवकरच काही तोडगा निघेल अशी जगाला अपेक्षा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा असे संकेत दिले आहेत. हॉर्मुज ताब्यात घेतल्याशिवाय युद्ध थांबू शकतं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Follow Us