AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET पेपर लीकप्रकरणी CBI च्या हाती लागलं मोठं गुपित, परीक्षेच्या एक आठवडा आधीच…

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणात नाशिकमधून मोठा खुलासा झाला आहे. संशयित शुभम खैरनार याच्याकडे २७ एप्रिललाच पेपर आला असून, १५ ते २० लाखांना त्याची विक्री झाल्याचा संशय आहे. सीबीआयकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

NEET पेपर लीकप्रकरणी CBI च्या हाती लागलं मोठं गुपित, परीक्षेच्या एक आठवडा आधीच...
neet exam
| Updated on: May 19, 2026 | 9:08 AM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपर लीक प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणी थेट नाशिक कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शुभम खैरनार याच्या हातात परीक्षा होण्याच्या तब्बल एक आठवडा आधी म्हणजेच २७ एप्रिल रोजीच नीटची प्रश्नपत्रिका पडली असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडून कसून चौकशी सुरू आहे.

नाशिक ते राजस्थान… असा पसरला पेपर

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी शुभम खैरनार याच्याकडे प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याने सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील काही संशयित व्यक्तींशी संपर्क साधला. याच साखळीचा पुढचा भाग म्हणून तो हरियाणातील एका व्यक्तीच्या संपर्कात आला. हरियाणातून हा पेपर पुढे राजस्थानमधील सिक्कर येथे पाठवण्यात आला. त्यानंतर तो देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि परीक्षा केंद्रांवर पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संशयित शुभम दोन दिवस नाशिकबाहेर; महाराष्ट्रभर प्रवास

शुभम खैरनार याच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच तो अचानक नाशिकमधून गायब झाला होता. तो दोन दिवस नाशिकबाहेर होता. या दरम्यान लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेचा प्रवास नाशिक ते अहिल्यानगर ते पुणे असा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हा पेपर पोहोचवून त्याचे नेटवर्क सक्रिय करण्यात आले होते.

या संपूर्ण रॅकेटमध्ये संशयितांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्यासाठी टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचा मुख्यत्वे वापर केला होता. जेणेकरून पोलिसांना याचा सुगावा लागणार नाही. अत्यंत गोपनीयतेने चाललेल्या या व्यवहारात २७ मे ते ३० मे या कालावधीत एका प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल १५ ते २० लाख रुपये मोजण्यात आल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अधिकृत परीक्षा होण्याच्या आधी, म्हणजेच ३ मेपूर्वीच या पेपरची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली होती.

CBI कडून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

या पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे देशभरात पसरल्याने आता सीबीआयने (CBI) या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय आहे. त्यामुळे सीबीआयने आता संशयितांच्या बँक खात्यांची आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?