AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाची सकाळी सकाळीच झोप उडाली, ट्रम्प यांची ती घोषणा अन् या गोष्टीचे वाढले भाव, भारतीय बाजारात…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणवरील भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे ब्रेंट क्रूड $105 पार गेले. यामुळे जागतिक शेअर बाजारात सुरुवातीला आशा असली तरी, भारतीय शेअर बाजारावर मात्र नकारात्मक परिणाम होऊन तो कोसळला. ट्रम्प यांनी तेल आयात करणाऱ्या देशांना सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.

जगाची सकाळी सकाळीच झोप उडाली, ट्रम्प यांची ती घोषणा अन् या गोष्टीचे वाढले भाव, भारतीय बाजारात…
ट्रम्प यांच्या भाषणाचे जगावर पडसाद
| Updated on: Apr 02, 2026 | 9:37 AM
Share

गुरूवार, 2 एप्रिलची सकाळ शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण युद्धासंदर्भात दिलेल्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जबरदस्त यू-टर्न पहायला मिळाला. एकीकडे ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले, मात्र दुसरीकडे होर्मुजची समुद्रधुनी स्वत:च सुरक्षत करण्याचे आव्हानही समोर ठेवलं. त्यांच्या या भाषणानंतर 100 डॉलर्सच्या खाली पोहोचलेल्या कच्च्या तेलाने मोठी उसाळी मारली असून आता कच्च्या तेलाचे भाव 105 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत.

होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली जाईल. जे लोक त्या मार्गाने तेल आयात करतात, त्यांनी या मार्गाच्या संरक्षणासाठी पुढे यावे. अमेरिका त्यांना मदत करेल, असंही ते म्हणाले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. आदल्या दिवशी प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली किंमत घसरल्यानंतर, जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आता 105 डॉलरच्या वर गेल्या.

तुमचं तेल स्वत: वाचवा नाहीतर आमच्याकडून खरेदी करा, ट्रम्प यांचं मोठं विधान

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलाची गरज नाही. त्यांनी भारत आणि चीनसारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना पुढे येऊन या सागरी मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केलं. युद्धामुळे तेल मिळवू न शकणारे देश अमेरिकेकडून तेल खरेदी करू शकतात, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी मांडला. “इराणचा पराभव झाला आहे, आम्ही हे काम लवकरच पूर्ण करू” असं ते म्हणाले.

कच्च्या तेलाचा किंमती पेटल्या

ट्रम्प यांच्या आजच्या भाषणापूर्वी कच्च्या तेलाच्या किमती कोसळत होत्या, मात्र त्यांच्य कठोर भूमिकेमुळे बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बेंट क्रूड (Brent Crude) तेलाच्या किमतीत अचानक जवळपास 4.7 % ची वाढ होऊन ती किंमत 99 डॉलरवरून 105.95 डॉलरवर पोहोचली.

WTI क्रूड देखील 3% पेक्षा जास्त वाढून 103.19 डॉलर्सवर पोहोतले.

जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत तेलाच्या किमती वाढतच राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक बाजारपेठेची परिस्थिती

सध्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी, ‘युद्ध संपण्याच्या आशेने’ शेअर बाजारांना चालना मिळाली आहे. वॉल स्ट्रीटवर, बुधवारी नॅसडॅक 1.16% नी वधारून बंद झाला, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्ये 0.48% ची वाढ झाली. आशियाई बाजारांमध्ये, जपानचा (Nikkei) आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी आज सकाळी 0.8% नी वधारले आहेत, कारण अमेरिका लवकरच या युद्धातून बाहेर पडेल असा गुंतवणूकदारांना विश्वास आहे.

भारतीय बाजारात परिस्थिती काय ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर संपूर्ण आशियाई बाजार हादरला. कच्च्या तेलाच्या किमती 105 डॉलरपर्यंत वाढल्या, ज्याचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. आज बाजार उघडताच दलाल स्ट्रीट कोसळला. बुधवारी बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी 50, दीड टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले होते, तर आज बाजार उघडताच ते सुमारे दीड टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स सुमारे 1500 अंकांच्या घसरणीसह उघडला.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...