होर्मुज खाडीत या कारणामुळे भारतीय जहाजावर गोळीबार? सरकारकडून अत्यंत मोठा खुलासा, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. परिस्थिती अधिक बिकड होताना दिसत आहे. त्यामध्येच होर्मुज खाडीकडे जगाचे लक्ष आहे. होर्मुज खाडीत परिस्थिती अधिक घातक होत आहे. नुकताच भारत सरकारकडून भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबाराबद्दल मोठे विधान करण्यात आले.

होर्मुज खाडीत या कारणामुळे भारतीय जहाजावर गोळीबार?  सरकारकडून अत्यंत मोठा खुलासा, थेट..
Hormuz Gulf firing Indian ship
| Updated on: Apr 23, 2026 | 7:42 AM

18 एप्रिल 2026 रोजी होर्मुज खाडीत एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. होर्मुज खाडीत थेट एका भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. भारतीय जहाजावर गोळीबार झाला. ज्यानंतर एक मोठा दावा केला जात आहे की, भारत सरकारने आपल्या जहाजांना होर्मुज खाडीतून काढण्याकरिता इराणला क्रिप्टोकरेंसी दिली. यावर आता भारत सरकारने आपली भूमिका मांडली. सरकारने हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. 18 एप्रिल रोजी भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबारानंतर दोन जहाज होर्मुज खाडीतून परत बंदरावर गेले. पुढे गेलेल्या जहाजावर इराणकडून फायरिंग करण्यात आली. यातील धक्क्कादायक बाब म्हणजे भारताचा ध्वज असतानाही या जहाजावर फायरिंग झाली. या जहाजावरील ऑडिओ क्लीपही पुढे आली. त्यात जहाजावर कॅप्टन सतत गोळीबार थांबवण्याची मागणी करत होते.

सुरूवातीला या जहाजाला होर्मुज खाडी पार करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर अचानक गोळीबार सुरूवात झाला. यावेळी सतत गोळीबार सुरू असताना कॅप्टन मला परत जाण्याकरिता वेळ द्या, गोळीबार थांबवा अशी विनंती करताना दिसले. चेन्नईची जहाज कंपनी सनमार यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, आमचे जहाज क्रिप्टोकरेंसीचे शिकार झाले, हा दावा खोटा आहे.

कंपनी होर्मुज खाडीत जहाजाला सुरक्षित काढण्याकरिता भारत सरकारच्या सर्व एजन्सीसोबत मिळू काम करत आहे. सरकारने देखील दावा फेटाळून लावला आहे. होर्मुज खाडीत अजूनही भारतीय जहाज मोठ्या संख्येने अडकले आहेत. होर्मुज खाडी भारतीय जहाजांच्या सुरक्षेबद्दल सरकार चिंतेत आहे. सतत इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात सरकार असल्याची माहिती मिळत आहे.

होर्मुज खाडीतील स्थिती भयंकर आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने एका इराणी जहाजाला ताब्यात घेतले. हे जहाज चीनहून इराणमध्ये दाखल होत होते. अमेरिकेने मोठी नाकेबंदी इराणभोवती केली आहे. ज्यामुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज दाखल होऊ शकत नाही आणि बाहेरही पडू शकत नाही. होर्मुज खाडी शांत व्हावी, ही जगाची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात इथे सर्वकाही उलटे घडत आहे.

Follow Us