AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या व्हायरसने जगात खळबळ, 12 देशांना तातडीचा अलर्ट; भारताचीही चिंता वाढली; संपूर्ण जहाजात…

या जहाजात हंताव्हायरस पसरल्याचे समोर आल्यानंततर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे आलेल्या महासाथीसारखीच परिस्थिती होणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. या जहाजातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

नव्या व्हायरसने जगात खळबळ, 12 देशांना तातडीचा अलर्ट; भारताचीही चिंता वाढली; संपूर्ण जहाजात...
hantavirus on cruise shipImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2026 | 4:29 PM
Share

Hantavirus : नेदरलँडचे MV Hondius नावाचे क्रुझ शिप सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या जहाजारवर हंताव्हायरस पसरल्याचे समोर आले आहे. या जहाजात एकूण 149 लोक फसलेले आहेत. यात एकूण दोन भारतीय क्रू मेंबर असल्याचेही म्हटले जात आहे. हे जहाज शनवाइड एक्सपेडिशन्स या कंपनीद्वारे चालवले जाते. सध्या हे जहाजा आफ्रिकेच्या केप वार्डे या भागात पाण्यात उभे असून जहाजातील लोकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान ही खबर समोर येताच आता जागतिक आरोग्य संघटनेने तब्बल 12 देशांना तातडीचा अलर्ट पाठवला आहे.

तीन लोकांचा मृत्यू

या जहाजात हंताव्हायरस पसरल्याचे समोर आल्यानंततर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे आलेल्या महासाथीसारखीच परिस्थिती होणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. या जहाजातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नेदरलँडचे एक दाम्पत्य असून एक जर्मनीच्या प्रवाशाचा समावेश आहे. याच जहाजावरील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले आहे. तर हंताव्हायरसची लागण झालेल्या अन्य प्रवाशांवरही उपचार केला जात आहे.

WHO कडून 12 देशांना अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार या जहाजावर एकूण 23 क्रू मेंबर्स आहेत. यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोन भारतीय नेमके कोण आहेत? हे समजू शकलेले नाही. या क्रुझ शिपमध्ये एकूण पाच जणांना हंता व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. अन्य तीन प्रवाशांचीही प्रकृती बिघडलेली असून त्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सेंट हेलेना या ब्रिटिश प्रदेशात या क्रुझ शिपमधील काही नागरिक उतरले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने एकूण 12 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. यात कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सेंट किट्स अँड नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.

Follow Us
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल