तब्बल 10 हजार वर्षांनी अजब घडलं, भारतावर सर्वात मोठं संकट, नेमकं काय घडतंय?
सध्या भारतावर एक मोठे संकट आले आहे. तब्बल 10000 वर्षांनी या संकटाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञांचे या संकटावर लक्ष असून काय होणार, असे विचारले जात आहे.

Hayli Gubbi : पृथ्वीच्या पोटात अशा काही रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्या बाहेर आल्यानंतर आपण थक्क होतो. काही गोष्टींचा तर अजूनही माणवाला शोध लागू शकलेला नाही. पृथ्वी मानवाला कधी काय दाखवेन हे सांगता येत नाही. सध्या असेच काहीसे घडले आहे. विशेष म्हणजे भारतापासून हजारो किलोमीटर दूर ही घटना घडली आहे. परंतु या एका घनटेनंतर भारत संकटात सापडला आहे. भारतासह पाकिस्तानलाही धोका निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 10 हजार वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेल्या एका मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक एवढा भीषण आहे की भारतापुढेदेखील मोठे संकट निर्माण झाले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा धूर तब्बल 45 हजार फूट म्हणजेच साधारण 14 किलोमीटर उंच गेला आहे. सध्या या ज्वालामुखीचा उद्रेक थांबला आहे. पण यामुळे भारत, पाकिस्तान तसेच इतर अनेक देशांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेला धूर सध्या जिबुती आणि येमेन या देशांच्या दिशेने जात आहे. याच ज्वालामुखीमुळे निर्माण झालेली अरबी समुद्रावरून इराण, पाकिस्तानच्या दिशेनेही जाण्याची शक्यता आहे. सोबतच भारतातील पंजाब, गुजरात ही राज्येही यामुळे प्रभावित होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोणत्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला
मिळालेल्या माहितीनुसार अरब द्वीपलकल्पांच्या जवळ असलेल्या इशान्य आफ्रिकेतील इथिओपिया येथे ज्वालामुखी सक्रिय झाला होता. या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज आला होता. ज्वालामुखीचे हे केंद्र सौदी अरेबियापासून साधारण 400 किमी दूर असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (23 नोव्हेंबर) सकाळी हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता.
WATCH: Ethiopian Volcano Erupts for the First Time in Thousands of Years pic.twitter.com/GxpBswyZw1
— Insider Paper (@TheInsiderPaper) November 24, 2025
हॅली गुब्बी असे ज्वालामुखीचे नाव
गेल्या दहा हजार वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता, असे सांगितले जात आहे. या ज्वालामुखीचे नाव हॅली गुब्बी (Hayli Gubbi) असे आहे. दरम्यान, या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असला तरी सध्या तो शांत आहे. या ज्वालामुखीचा धूर भारतापर्यंत येण्याची शक्यता असली तरी फारशी काळजी करण्यासारखे नाही असे म्हटले जात आहे.
