हाहा:कार… होर्मुजमध्ये स्फोटकांना सुपरटँकरची भीषण धडक, एका क्षणात भयंकर आग… इराणची तडकाफडकी वॉर्निंग काय?

होर्मुज स्ट्रेटमध्ये एका सुपरटँकरला नाविक माइन्सची धडक लागून भीषण आग लागली, ज्यामुळे सागरी वाहतूक थांबली. इराणच्या गार्डने जहाजाने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांना गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेने या घटनेला इराणच्या माइन्स कारवाईचा भाग म्हटले आहे. या प्रकारामुळे होर्मुज स्ट्रेटमधील सागरी सुरक्षा आणि इराण-अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.

हाहा:कार... होर्मुजमध्ये स्फोटकांना सुपरटँकरची भीषण धडक, एका क्षणात भयंकर आग... इराणची तडकाफडकी वॉर्निंग काय?
Hormuz Supertanker Fire
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 12:54 PM

होर्मुज स्ट्रेटमध्ये एक सुपरटँकर दोन नाविक माइन्सला धडकल्याने मोठी आग लागली आहे. होर्मुज स्ट्रेटच्या दक्षिणेकडील भागातील ज्या रस्त्याने जाण्यास मनाई आहे, जिथून जाण्यास बेकायदेशीर मानल्या गेलंय, त्याच रस्त्याने हे जहाज गेल्याचं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने म्हटलंय. इथून जात असतानाच सुपरटँकर दोन माइन्सला जाऊन धडकले. त्यामुळे महाभयंकर आग लागल्याने या परिसरातील वाहतूक थांबली आहे. या घटनेमुळे हाहा:कार उडाला आहे.

इराण रिव्होल्यूशनरी गार्ड म्हणजे आयआरजीसीने या जहाजाला नियमांचं पालन न करणारा सुपरटँकर म्हटलं आहे. हे जहाज होर्मुज स्ट्रेटच्या दक्षिणी मार्गाने जात होतं. त्याचवेळी दोन नाविक माइन्सला धडकले. टक्कर झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागली. त्यामुळे हे जहाज तिथेच थांबवण्यात आलं, असं आयआरजीसीने म्हटलं आहे. मात्र, आयआरजीसीने जहाजाचं नाव, त्याचा झेंडा आणि चालक दलाची माहिती दिलेली नाहीये. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती आहे.

इराणची वॉर्निंग

या घटनेनंतर इराणने वॉर्निंग जारी केली आहे. जे जहाज इराणने दिलेल्या नेव्हिगेशन नियमांचं उल्लंघन करेल, त्यांची अवस्था या जहाजांसारखीच होईल. तुम्हाला नियमांचं पालन करावंच लागेल, असा इशाराच आयआरजीसीने दिला आहे. इराणने शिपिंग कंपन्यांना अमेरिकेचा आदेश न मानण्याचे आदेश दिले आहेत.

होर्मुज स्ट्रेटमध्ये माइन्सचा धोका हा अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या सैन्य कारवाईचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेने इराणच्या लारक आयलँडवर हल्ला केला होता. अमेरिकन सैन्याच्या मते, लारकवर आयआरजीसीच्या दोन लॉन्च सिस्टिमला निशाणा बनवलं होतं. इराणी सैन्य या लॉन्च सिस्टिमच्या आधारे होर्मुज स्ट्रेटमध्ये सागरी माइन्स टाकण्याचं काम करत असल्याचा अमेरिकेचा दावा होता.

शिपिंगसाठी होर्मुज धोकादायक

अमेरिकन सेंट्रल कमांडने या घडामोडींवर भाष्य केलं आहे. या घडामोडींमुळे स्ट्रेटमधून जाणाऱ्या जहाज आणि आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी मोठा आणि तात्काळ धोका असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. आम्ही होर्मुजच्या आंतरराष्ट्रीय शिपिंग रुटच्या आधी असलेल्या माइन्सला हटवण्याचं काम केलं होतं. इराणी सैन्याने त्या ठिकाणी दुसऱ्यांदा माइन्स टाकण्याची तयारी केली होती, असं अमेरिकेने म्हटलंय.

आता एक सुपरटँकर दोन माइन्सला धडकल्याचा इराणने दावा केला आहे. त्यामुळे होर्मुज स्ट्रेटमध्ये शिपिंगच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. इराणचा इशारा आणि अमेरिकन सैन्य कारवाईच्या दरम्यान या महत्त्ववाच्या सागरी मार्गावर सातत्याने तणाव वाढलेला आहे.

Follow Us