हुती बंडखोरांनी लाल समुद्रात स्फोटाने जहाज उडवले, टायटॅनिकसारखे बुडाले, Video

इस्राईल - हमास संघर्षात हुती हमासच्या बाजूने लढत आहे. इस्राईल आणि हमास संघर्षात हुती विद्रोही लाल सागरात व्यापारी जहाजांना लक्ष्य करीत आले आहेत.

हुती बंडखोरांनी लाल समुद्रात स्फोटाने जहाज उडवले, टायटॅनिकसारखे बुडाले, Video
| Updated on: Jul 09, 2025 | 4:52 PM

येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रात मॅझिक सीज नावाच्या जहाजावर हल्ला करुन त्याला बुडवले आहे. हे जहाज लायबेरियाचा झेंडा लावलेले होते आणि युनानी मालकीचा एक बल्क कॅरिअर होते. येमेनच्या हुती बंडखोरांनी हा हल्ला ६ जुलै रोजी केला आहे. या जहाजावर हल्ला करण्यासाठी हुतींनी ड्रोन,मिसाईल, रॉकेटचलित ग्रेनेड आणि छोट्या शस्रास्रांचा वापर केला. या जहाजावर हल्ल्याचा एक व्हिडीओही हुती बंडखोरांनी जारी केला आहे. या व्हिडीओत हे समुद्री जहाज भयानक स्फोटानंतर बुडताना दिसत आहे.

या ब्लास्टच्या काही सेंकदातच या जहाजाला आग लागलेली दिसली . आणि पाहाता पाहाता भयानक स्फोट होऊन हे मॅजिक सीज नावाचे जहाज दोन तुकड्यात विभागून लाल सागरात बुडाले. हुतींनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दावा केला आहे की या जहाजाने इस्रायलवर त्यांनी लावलेल्या नाकाबंदीचे उल्लंघन केले होते. हुतींच्या हल्ल्यामुळे जहाजावरील २२ चालक दल सदस्यांना जहाज सोडून पळावे लागले. त्यानंतर त्यांना सुखरुपपणे वाचवण्यात आले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

युरोपीयन संघाचे नौदल मिशन ऑपरेशन एस्पायड्सने मंगळवारी दुजारो दिला की लाल सागरात लायब्रेरियाचा झेंडा लावलेले ग्रीक मालकीचे मालवाहू जहाजावर हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन नौसैनिक मारले गेले असून दोन जखमी झाले आहेत.

जहाजावरील जखमी चालक दलाच्या एका सदस्याने त्याचा एक पाय गमावला आहे. आणि जहाज आता पाण्यात बुडत आहे. हे बल्क करियर सोमवारी रात्री स्वेज नहरच्या दिशेने उत्तरेकडे चालले होते. त्याच वेळी त्यावर छोट्या नौकांनी आणि बॉम्ब लोड केलेल्या ड्रोनने लागोपाट फायरिंग केली. जहाजावर तैनात सशस्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिले, परंतू ते नुकसान रोखू शकले नाहीत.

इस्राईल आणि हमास संघर्षात हुती विद्रोही लाल सागरात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहेत. इस्राईल – हमास संघर्षात हुती हमासच्या बाजूने लढत आहे. या घटनेने समुद्र सुरक्षेची चिंता वाढत आहेत. लाल सागर जागतिक व्यापारासाठी महत्वाचा मार्ग आहे. या हल्ल्याने ग्लोबल सप्लाय चेनवर परिणाम होणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. हुतींच्या या पावलाने मध्य पूर्वेतील आधी जटील असलेल्या स्थितीला आणखीन अडचणीत आणले आहे.