AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बनवणार सर्वात खतरनाक हायपरसॉनिक मिसाईल, DRDO चा ‘प्रोजेक्ट विष्णु’ शत्रुच्या हृदयात धडकी भरवणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि बदलत्या जागतिक स्थितीत भारताने अत्यंत आधुनिक हायपरसॉनिक मिसाईल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या १२ मिसाईल तयार केल्या जणार असून भारत असे तंत्रज्ञान असलेला अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश बनणार आहे.

भारत बनवणार सर्वात खतरनाक हायपरसॉनिक मिसाईल, DRDO चा 'प्रोजेक्ट विष्णु' शत्रुच्या हृदयात धडकी भरवणार
| Updated on: Jul 09, 2025 | 4:07 PM
Share

सीमेवर चारीबाजूंनी वाढत्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारत आपली सैन्य ताकद वाढवण्याच्या मागे लागला आहे. आता भारताने आपल्या क्षेपणास्र ताकद नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रोजेक्ट विष्णु अंतर्गत भारत आता शत्रूंची झोप उडवणार आहे. या प्रोजेक्टवर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO – डीआरडीओ ) वेगाने काम करीत आहे. असा दावा केला जात आहे की भारत आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक हायपरसॉनिक मिसाईल टेक्नॉलॉजीवर काम करीत आहे.

आशियाई क्षेत्रात बदणार शक्ती संतुलन

DRDO या स्पेशल प्रोजेक्ट अंतर्गत एकाच वेळी १२ वेगवेगळ्या हायपरसॉनिक मिसाईवर काम करीत आहे. या मिसाईल इतक्या वेगवान असतील की संपूर्ण आशियात शक्ती संतुलन बदलण्याची त्यांची क्षमता आहे. या मिसाईलचा वेग ८ मॅक म्हणजे सुमारे ११,००० किलोमीटर प्रति तास असणार आहे. या वेगामुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.

हल्ला क्षमतेसह एअर डिफेन्स देखील मजबूत

प्रोजेक्ट विष्णु द्वारे हल्ला करणाऱ्याच मिसाईल बनवल्या जातील असे नव्हे तर याशिवाय इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीम देखील बनवली जात आहे. जी शत्रूच्या क्रुझ वा बॅलेस्टीक अशा दोन्ही मिसाईलना हवेतच नष्ट करू शकेल. म्हणजेच भारताची हवाई सुरक्षा देखील आधीपेक्षा अनेक पटीने मजबूत होणार आहे.

पुढील पाच तयार होणार योजना

DRDO ची योजना आहे की साल २०३० पर्यंत हायपरसॉनिक ग्लाईड व्हीईकल ( HGV ) तंत्रज्ञानाला संपूर्णपणे ऑपरेशनल केले जाणार आहे. यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही भागास काही मिनिटात टार्गेट करता येणार आहे. खास बाब म्हणजे या मिसाईलना रोखणे शत्रूंना जवळपास अशक्य असणार आहे.

कंट्रोल ही होणार, रडारना चकवाही देणार

या मिसाईलमध्ये अत्याधुनिक एडव्हान्स नेव्हीगेशन आणि कंट्रोल सिस्टीम देखील असेल. म्हणजे मिसाईलना लाँच केल्यानंतर देखील मधल्या रस्त्यात याचे टार्गेट बदलता येणार आहे. याशिवाय शत्रूच्या रडारला देखील चकवा देण्यास सक्षम होणार आहे.

स्क्रॅमजेट इंजिनमुळे जबरदस्त वेग मिळणार आहे. ET-LDHCM नावाची मिसाईल स्क्रॅमजेट इंजिनाने सुसज्ज असणार आहे. त्यामुळे त्याना हायपरसॉनिक वेग मिळणार आहे. याची प्राथमिक ट्रायल देखील डीआरडीओने घेतली आहे. या मिसाईलना कोणत्याही मोबाईल लाँचर तसचे विमाने किंवा नौदलाच्या युद्धनौकानेही डागता येणार आहे.

मिसाईलची रेंज २००० किलोमीटर

या मिसाईलची रेंज सुमारे २००० किलोमीटरपर्यंत असणार आहे. ही मिसाईल पारंपारिक ते अणूबॉम्ब देखील वाहून नेण्यास सक्षम असणार आहे. चीनसारख्या देशांच्या एअर डिफेन्स सिस्टीमनाही या मिसाईलना रोखता येणे सोपे असणार नाही, प्रोजेक्ट विष्णू पूर्ण होताच भारत जगातील सर्वात अत्याधुनिक आणि घातक हायपरसॉनिक मिसाईलची ताकद असणारा देश होणार असून कोणत्याही शत्रूच्या हृदयात त्यामुळे धडकी भरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.