AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा जर्मनीच्या विमानावर लेझर हल्ला, रेड सीमध्ये पसरला प्रचंड तणाव

चीनच्या या पावलाने आता या मोहिमेची निष्पक्षता आणि त्याच्या संचलनाची स्वतंत्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खास करुन जेव्हा एखादा असा देश लेझर सारख्या खतरनाक ‘नॉन-कॉन्व्हेंशनल’ शस्राचा वापर करतो आणि जो स्वत: शांततेची वार्ता करतो.

चीनचा जर्मनीच्या विमानावर लेझर हल्ला, रेड सीमध्ये पसरला प्रचंड तणाव
| Updated on: Jul 08, 2025 | 8:08 PM
Share

लाल समुद्रात सुरक्षा मोहिमेवर तैनात असलेल्या जर्मनीच्या एका सर्व्हेलन्स एअरक्राफ्टवर चीनच्या नौदलाने हल्ला केला आहे. हा हल्ला ना मिसाईलने, ना बॉम्बने झाला असून तो एका अशा शस्राने झाला आहे. ज्याला आतापर्यंत नॉन-लेथल वा सावधानता देणारे शस्र म्हटले जात होते. चीनने लेझर वेपनचा वापर केला आहे. ही घटना युरोपियन युनियनच्या ASPIDES मोहिमेंतर्गत झाली आहे. ज्याचा उद्देश्य रेड सी आणि गार्ड ऑफ अडन सारख्या खतरनाक समुद्री इलाक्यात नागरिक जहाज आणि नौकांचे संरक्षण करणे हा आहे. हा विभाग आधीच हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे आधीच हाय रिस्क झोन घोषीत केलेला आहे.

बर्लिनच्या चीनी राजदूताला समन्स

जर्मनीने या घटनेला संपूर्णपणे अस्वीकार्य म्हटले आहे. आणि चीनच्या विरोधात तीव्र राजकीय विरोध दर्शवला आहे. जर्मन परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की चीनच्या या कुरापतीमुळे मोहिम संचालन सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला आहे.

या घटनेनंतर बर्लिनमध्ये चीनी राजदूताला समन्स पाठवले आहे. या घटनेनंतर चीनच्या सरकारच्यावतीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. बिजींग शांत आहे, या युरोपने या मौनावर संशयाच्या नजरेने पाहीले आहे.

सर्व्हेलन्स एअरक्राफ्टने अर्ध्यावर सोडले मिशन

जर्मन संरक्षण मंत्रालयाच्या मते ज्या विमानावर लेझर हल्ला झाला ते एक खाजगी कमर्शियल प्रोव्हायडरचे होते. परंतू त्यात जर्मनीचे लोक तैनात होते. हे विमान सुरक्षा मोहिमे अंतर्गत समुदातील कर्मशियल बोटींवर पाळत ठेवत होते.

लेझर हल्ल्याची कोणतीही आगाऊ सूचना दिली नव्हती. न चीनच्या वतीने कोणताही संपर्क केला गेला. जशी लेझर किरणे विमानावर पडली, ही मोहित तात्काळ थांबवण्यात आली आणि विमान सुरक्षितपणे जिबूती येथील बेसवर परतले.या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झालेली नाही.

ASPIDES मिशन: एक शांतेचा प्रयत्न

ASPIDES यूरोपीय संघाची एक मोहीम असून संपूर्णपणे कमर्शियल जहाजे आणि बोटीच्या सुरक्षेसाठी ती आहे. ही कोणत्याही प्रकारच्या सैन्य मोहीम अथवा कारवाईचा भाग नाही. परंतू ज्या प्रकारे हुती विद्रोही लागोपाठ जहाजांना निशाना केले जात आहे. त्यामुळे या मोहिमेची जोखीम आता आणखी वाढली आहे.

समुद्री सुरक्षेवर नवीन संकट

लेझरने केलेला हा तांत्रिकदृष्ट्या कमी हानिकारक मानला जातो. परंतू हा एक मोठा संकेत आहे. हा केवळ सैन्याच्या नियमांचे उल्लंघन नसून भविष्यातील सुमद्रातील संघर्षाची चुणूक देत आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात एका मोहिमेवर असलेल्या विमानाला कोणतीही पूर्व सूचना न देता टार्गेट केले जाते. तर ही घटना संपूर्ण ऑपरेशनल एथिक्स आणि नियमांवर प्रहार करते.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.