मोसादने कसा घडवला पेजरमध्ये स्फोट? खिशात असलेले पेजर अचानक कसे फुटले

बॉम्बस्फोट किंवा मानवी स्फोट घडल्याच्या अनेक घटना जगभरात घडल्या आहेत. मात्र लेबनॉनमधल्या एका घटनेनं सारं जग हादरलं आहे. या घटनेमागे इस्रायलच्या मोसादवर आरोप होतो आहे. नेमके स्फोट कसे घडवले गेले. पाहूयात

मोसादने कसा घडवला पेजरमध्ये स्फोट? खिशात असलेले पेजर अचानक कसे फुटले
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 11:47 PM

स्फोट घडवण्याच्या नव्या तंत्रानं साऱ्या जगात खळबळ उडाली आहे. स्फोट झाले आहेत लेबनॉन आणि सिरियात. ते सुद्दा मेसेंजरसाठी वापरल्या जाणाऱ्या पेजरमध्ये. एक-दोन नव्हे तर तासभर पेजर स्फोटांचा सिलसिला सुरु होता. ज्यात 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि ३ हजारांहून जास्त लोक जखमी झाले आहेत. घरांमधले, दुकानांमधले आणि लोकांच्या खिशात असलेले पेजर अचानक फुटले. माहितीनुसार हे सारे स्फोट इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादनं हिजबुल्लाहला टार्गेट करण्यासाठी करण्यात केले. हिजबुल्लाह ही इराण समर्थक लेबनॉनमधील दहशतवादी संघटना आहे. पण हातामधले पेजर अचानक बॉम्बस्फोटात कसे काय बदलले., त्यासाठी नेमकं काय तंत्रज्ञान वापरलं गेलं. यावरुन जगभरात हल्लकल्लोळ सुरु आहे.

पेजर हे मोबाईल येण्याआधी संपर्कासाठी वापरलं जाणारं एक इलेक्ट्रॉनिक यंत्र होतं. पेजरद्वारे प्रत्यक्ष संवादाऐवजी फक्त मेसेजची देवाण-घेवाण केली जाते. जगभरात पेजरचा उपयोग होत नसला तरी माहितीनुसार लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून इस्रायलपासून बचावासाठी हिजबुल्लाहसारख्या संघटना आजही पेजरचा उपयोग करतात.

मात्र मुद्दा हा आहे की.,एकाचवेळी इतक्या साऱ्या पेजरमध्ये जर मोसादनं स्फोट घडवून आणला असेल. तर ते शक्य कसं झालं. सीएनएनच्या दाव्यानुसार पेजर हॅक करुन त्यांच्यातल्या लिथीयम बॅटरिला गरम करण्यात आलं आणि एक प्रोगाम बनवून विशिष्ट प्रकारचा मेसेज पेजरवर पाठवला गेला. त्याचवेळी पेजर स्फोटासारखे फुटले. एक दावा असाही आहे की पेजरचं उत्पादन करतानाच त्यांच्यात काही ग्रॅम स्फोटक लावली गेली होती. ज्यांना एका रिमोटद्वारे ऑपरेट करुन स्फोट घडवला गेला. इस्रायलच्या मोसाद संघटनेनं तब्बल ५ हजार पेजरवर ३ ग्रॅमपर्यंतचे स्फोटकं लावल्याचाही आरोप होतोय.

ताईवानच्या एका कंपनीकडून हिजबुल्लाहनं ५ हजार पेजर खरेदी केले होते. जुन्या तंत्रज्ञानाचे पेजर ट्रॅक होत नसल्यामुळे इस्रायली संघटनांना लोकेशन न सापडू देण्याचा यामागचा हेतू होता. मात्र तेच पेजर्स स्फोटात रुपांतरित झाल्यानं यामागे इस्रायलच्या मोसादचा हात असल्याचं सांगितलं जातं आहे.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....