
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याची नोटीस दिलेली आहे. हा नवा टॅरिफ सिस्टीम २७ ऑगस्टच्या रात्री १२.०१ वाजता लागू होणार आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल जगातील पाच सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी निर्यातीच्या क्षेत्रात आव्हानात्मक ठरणार आहे.
आर्थिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या रिपोर्टनुसार या वाढलेल्या टॅरिफने ६०.२ अब्ज डॉलरची भारतीय निर्यात प्रभावित होत आहे. यात टेक्सटाईल, ज्वेलरी, सी फूड, गालिछा आणि फर्निचरचा समावेश आहे. अशात आता चीन, व्हीएतनाम आणि मेक्सिको या बाजारास कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अमेरिकेचे टॅरिफ लागू होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे व्यापारी आव्हान असणार आहे.
जीटीआरआयने सांगितले की अमेरिकन शुल्काने भारताकडून अमेरिकेत होणाऱ्या ८६.५ अब्ज डॉलर निर्यातीपैकी ६६ टक्क्यांवर परिणाम होणार आहे. या स्थिती भारताची आर्थिक विकास सुरु राहण्यासाठी चांगल्या रणनितीची गरज आहे. तसेच रोजगार आणि इंडस्ट्रीयल कॉम्पीटीशनवर पडणाऱ्या प्रभावाला नियंत्रित करावे लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै दरम्यान अमेरिकेला भारताकडून होणारी एकूण निर्यात २१.६४ टक्के वाढून ३३.५३ अब्ज डॉलर झाली आहे.तर आयात १२.३३ टक्के वाढून १७.४१ अब्ज डॉलर झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की भारताच्या वतीने अमेरिकेला निर्यात करण्यात मोठी कपातीचा सामना करावा लागू शकतो. अंदाज आहे की आर्थिक वर्षे २०२५ मध्ये ८६.५ अब्ज डॉलरवरून घटून आर्थिक वर्षांतही ४९.६ अब्ज डॉलर होऊ शकते. जीटीआरआयच्यानुसार ३० टक्के निर्यात ( २७.६ अब्ज डॉलर ) शुल्क मुक्त राहील. ऑटो पार्ट्समध्ये ४ टक्क्यांवर ( ३.४ अब्ज डॉलर ) २५ टक्के टॅरिफ लागेल. जर टेक्सटाईल, ज्वेलरी, सी फूड, गालिछे आणि फर्निचरवर ६६ टक्क्यांवर (६०.२ अब्ज डॉलर) ५० टक्के टॅरिफ लागणार आहे.