फाशीची शिक्षा झालेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना किती श्रीमंत? संपत्तीचा आकडा समोर, नोकराकडेच 284 कोटी रुपये
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2024 च्या हिंसाचार प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर आता त्यांच्याकडे किती संपत्ती आहेत, याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशात 2024 साली उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना या प्रकरणी बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता, या हिसाचारामध्ये अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला, दरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश दिला असा आरोप त्यांच्यावर होता, या प्रकरणात बांगादेशच्या न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, या प्रकरणात आता बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे, शेख हसीना यांना मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये फाशीची शिक्षणा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान 2024 मध्ये बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला,यामध्ये अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पाय उतार व्हावं लागलं, त्या आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती बांगलादेशमध्येच सोडून भारताच्या आश्रयाला आल्या. मध्यतंरी शेख हसीना यांच्या केवळ एका सामान्य नोकराकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची बातमी समोर आली होती, त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या, शेख हसीना यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
शेख हसीना यांनी बांगलादेशमध्ये अनेक व्यावसायात मोठी गुंतवणूक केली आहे, त्यातून त्यांना वर्षाकाठी 12 लाख रुपये मिळतात, अशी माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशमधील टेलिकम्यूनिकेशन क्षेत्र, आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शेख हसीना यांची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये असल्याची माहिती निवडणूक डेटामधून समोर आली आहे. 2018 मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांच्याकडे एकूण 13 लाख रुपयांचं सोनं आहे. शेख हसीना यांच्याकडे या व्यतिरिक्त 15 एकर शेती आहे, तसेच एक जमिनीचा मोठा प्लॉट आणि तीन मजली इमारत देखील त्यांच्या मालकीची आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार शेख हसीना यांचं एक अलिशान घर लंडनमध्ये आहे. मात्र ते घर त्यांच्या नावावर नसल्याची माहिती समोर आली आहे.
