किती श्रीमंत आहेत 90 वर्षांचे दलाई लामा, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय ?
तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरु दलाई लामा सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या ९० वा वाढदिवस येत्या ६ जुलै रोजी आहे. त्यांचा उत्तराधिकारी ते त्या दिवशी जाहीर करणार असून तो कोण होणार याकडे चीनसह अनेक बौद्ध देशांचे लक्ष लागले आहे.

तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा सध्या चर्चेत आहेत. दलाई लामा हे नाव नाही तर पद आहे. तिबेटीयन बौद्ध धर्माच्या इतिहासात आतापर्यंत १४ लामा झाले आहेत. सध्याचे दलाई लामा हे ६ जुलै रोजी ९० वर्षांचे होणार आहेत. त्यांचे खरे नाव ल्हामो धोंडुप होते. त्यांनी १९५९ मध्ये हजारो तिबेटी लोकांसह चीनी सरकारविरोधात अयस्वी विद्रोह केल्यानंतर भारतात आश्रयाला आले आहेत. तेव्हापासून ते भारतातून तिबेटीयन लोकांचा लढा लढत आहेत.
सध्याच्या दलाई लामांबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहेत. अखेर त्यांचे जीवन कसे असते. त्यांचे जीवन कसे चालते. त्यांना कुठून कमाई होते. त्यांची संपत्ती नेमकी किती आहे. त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. अशात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात..अखेर त्यांचा चरितार्थ कसा चालतो.
दलाई लामा यांची एकूण संपत्ती किती ?
मीडियातील बातम्यांनुसार धर्मगुरु दलाई लामा यांची संपत्ती १५० दशलक्ष डॉलर असल्याचे म्हटले जात आहे. हा आकडा तुम्हाला कोड्यात टाकू शकतो. कारण ज्या प्रकारची जीवनशैली लामा यांची आहे. त्यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. या रकमेचे भारतीय मुल्य १,३०० कोटी रुपये होते. मीडियातील रिपोर्टनुसार हा आकडा धक्कादायक असला तरी खरा आहे. लामा यांच्या संपत्तीत वाढ होतच आहे.
दलाई लामा कसे पैसे कमावतात ?
दलाई लामा यांना त्यांच्या भाषणातून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या रॉयल्टी, तसेच दान आणि खाजगी शिक्षणातून पैसे मिळतात. असे म्हणतात की दलाई लामा यांना दिलेल्या सर्व दानाच्या रकमेचा विविध मानवीय आणि शैक्षणिक योजनांसाठी खर्च केला जातो. त्याशिवाय त्यांना त्यांचे आत्मकथा फ्रीडम इन एक्साइल आणि चित्रपट , जाहिराती. आणि अन्य मीडियात उपस्थितीबद्दल बक्कळ रॉयल्टी आणि मानधन मिळत असते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत लागोपाठ वाढच होत आहे.
दलाई लामा चर्चेत का ?
सध्या दलाई लामा खुप चर्चेत आहेत. कारण त्यांचा ६ जुलै रोजी ९० वा वाढदिवस आहे. तसेच ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार आहेत. त्यांनी घोषणा केली आहे की त्यांच्यानंतरही तिबेटसाठी लढा देणारी संस्था चालूच राहील. त्यामुळे दलाई लामा यांच्यानंतरही हा लढा चालूच राहणार आहे.त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे चीनसह अनेक बौद्ध राष्ट्रांचेही लक्ष लागले आहे.
