AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका फोन कॉलमुळे गेले पंतप्रधान पद, अखेर थायलँड PMच्या लिक झालेल्या संवादात काय होते ?

एपीच्या बातम्यानुसार नंतर शिनावात्रा यांनी याबद्दल देशाची माफी मागितली.परंतू त्यांनी आपल्या संभाषणाला एक रणनिती म्हणून सांगत आणि राष्ट्रीय हिताला त्यामुळे कोणतीही बाधा आली नसल्याचा दावा केला आहे.

एका फोन कॉलमुळे गेले पंतप्रधान पद, अखेर थायलँड PMच्या लिक झालेल्या संवादात काय होते ?
| Updated on: Jul 02, 2025 | 10:10 PM
Share

भारतीय पर्यटकांचा आवडता देश थायलंडमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे.येथे एका टेलिफोन कॉलमुळे पंतप्रधान पॅतोंगटार्न शिनावात्रा यांची खुर्ची गेली आहे. कोर्टाने पंतप्रधान शिनावात्रा यांना निलंबित केले आहे. या निर्णय शत्रू देश कंबोडीयाचे सीनेट अध्यक्ष हुन सेन यांच्याशी केलेल्या बातचीत मुळे झाला आहे. शिनावात्रा यांचे हे टेलिफोनिक संभाषण अशा काळात झाले जेव्हा सीमेवर थायलंड आणि कंबोडीयन सैनिक आपआपसात भिडले होते.

२८ मे रोजी सीमेवर दोन्ही देशांची सैनिक परस्परांना भिडले होते. त्यानंतर १५ जून रोजी थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडीयाचे सीनेट अध्यक्ष हुन सेन यांच्याशी संभाषण केले होते. दोघांचे हे संभाषण लीक झाले आहे. यानंतर थायलंडमध्ये राजकीय भूकंप आला आहे. विरोधकांनी शिनावात्रा यांच्यावर राष्ट्रीय हिताशी समझोता करणे आणि सैन्य अधिकार कमजोर करण्याचा आरोप केला आहे.

हुन सेन यांनीच शिनावात्रा यांच्यातील हे संभाषण रेकॉर्ड केले होतो. त्यानंतर त्यांनी ते लीक केले. हन सेन यांनी दावा केला की त्यांनी हे संभाषण ८० हून अधिक लोकांना पाठवले आहे.

संभाषणात काय होते?

या संभाषणात शिनावात्रा आणि हुन सेन यांना थायलंड आणि कंबोडीयातील सीमा तणावावर उपाय योजने आणि संघर्षानंतर लावलेले निर्बंध कमी करण्याबद्दल चर्चा झाल्याचे उघड झाले आहे. काही बातम्यांनुसार शिनावात्रा यांनी संभाषण करताना हन सेन यांना अंकल म्हटल्याचा दावा केला आहे. हुन सेन हे शिनावात्रा यांचे वडील थाकसिन शिनावात्रा यांचे जवळचे मित्र होते. ते थायलंडचे माजी पंतप्रधान देखील होते.

शिनावात्रा यांनी कथितपणे हुन सेने यांना थायलंडच्या दुसऱ्या पक्षाचा म्हणणे ऐकू नये असा आग्रह केला आणि कंबोडियावर टीका करणाऱ्या एका थायलंडच्या सेना कमांडरला टार्गेट केले होते. लीक झालेल्या संभाषणात शिनावात्रा यांनी सेना कमांडरला एका विरोधकाचे लेबल लावल्याचे उघडकीस आले होते.

शिनावात्रा एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी आपल्याच सेना कमांडरवर टीका करीत त्यांना केवळ कुल दिसायचे आहे अशी टीका केली होती. त्यांनी हुन सेन यांना तुम्हाला काय पाहीजे ते सांगा असे सांगत आपण हा वाद मॅनेज करु असेही म्हटल्याचे उघड झाले आहे. थायलंडमधील टीकाकारांनी हे विधान अत्यंत तडजोड करणारे आणि थायलंडच्या राजनैतिक आणि लष्करी प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे असल्याचा आरोप केला आहे.

28 मे रोजी झाली चकमक

28 मे रोजी थायलंड आणि कंबोडीयन सीमेवरील वादग्रस्त क्षेत्रात गोळीबार झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप लावला आणि आत्मरक्षेसाठी आम्ही कारवाई करु अशी धमकी दिली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशातील बरीच वर्षे सुरु असलेला सीमावाद पुन्हा उकरला गेला आहे. दोन्ही देशांनी नंतर तणाव कमी करण्याची हमी दिलेली आहे.फेब्रुवारी कंबोडियन सैनिकांनी वादग्रस्त जागेतील पुरातन मंदिर परिसरात प्रवेश करीत तेथे राष्ट्रगीत म्हटले होते. त्यामुळे थायलंडचे सैनिक भडकले. हे मंदिर १००० वर्षे जुने असून दोन्ही देश त्यावर दावा करीत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.