AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांसाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी इराणला एक गंभीर इशाराही दिला आहे, ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर... डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
Trump war againImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 23, 2026 | 10:40 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांसाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जागतिक स्तरावर स्वागत होत आहे. मात्र ट्रंप यांनी स्पष्ट केले आहे की जर इराणने चर्चेद्वारे सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर बॉम्बहल्ले पुन्हा सुरू केले जातील. यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संपूर्ण जगाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढणार आहे. डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात सतत संपर्क सुरू असून दोन्ही देश युद्ध समाप्त करण्याच्या अटींवर सहमतीकडे वाटचाल करत आहेत.’ मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे दावे फेटाळून लावले असून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आरोप केला की ट्रंप केवळ ऊर्जा बाजार (तेलाच्या किमती) कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

लवकरच तोडला निघणार

काही दिवसांपूर्वी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम देऊन तणाव वाढवणारे ट्रंप यांनी सोमवारी 5 दिवस हल्ले थांबवण्याची आणि इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. फ्लोरिडाहून मेम्फिसला रवाना होताना त्यांनी सांगितले की मध्यपूर्वेसाठी त्यांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरड कुशनर इराणी प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत आणि ही चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. ट्रंप म्हणाले, ‘आपण तोडगा काढण्याच्या खूप जवळ आहोत. आमची चर्चा अतिशय मजबूत राहिली आहे. ती कुठपर्यंत पोहोचते ते पाहावे लागेल. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमची सहमती झाली आहे. जवळपास सर्वच मुद्द्यांवर सहमती झाली आहे.’

…तर इराणमध्ये सत्ताबदलाचा विचार करू – ट्रम्प

इराणकडून कोणाशी चर्चा होत आहे, असा प्रश्न विचारल्यावर ट्रंप यांनी सांगितले की, आमचे दूत इराणमधील अशा व्यक्तीशी बोलत आहेत ज्यांना तिथे आदर आहे. मात्र त्यांनी मोजतबा खामेनेई यांच्याशी कोणतीही चर्चा होत नसल्याचे स्पष्ट केले. ट्रंप यांनी असेही संकेत दिले की, जर इराणने माघार घेतली नाही, तर अमेरिका सत्तांतराच्या दिशेने पावले उचलू शकते. ट्रम्प म्हणाले की, ‘वेनेझुएलाप्रमाणे सत्ताबदल करून नवीन नेतृत्व स्थापन करण्याचा विचार केला जाऊ शकतो.’

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?