ऑपेरशन सिंदूर अजून एक आठवडा सुरू असते तर…बलूच नेत्याचे ते पंतप्रधान मोंदीना पत्र, तुम्ही वाचले का?

Baloch Leader Mir Yar Baloch : बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि नेते मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात ऑपरेशन सिंदूर, ISI आणि पाकिस्तानच्या लष्करासह सरकारवर निशाणा साधला गेला आहे.

ऑपेरशन सिंदूर अजून एक आठवडा सुरू असते तर...बलूच नेत्याचे ते पंतप्रधान मोंदीना पत्र, तुम्ही वाचले का?
बलुचिस्तान नेत्याचे ते पत्र काय
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: May 28, 2025 | 2:29 PM

बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, पत्रकार आणि नेते मीर यार बलोच यांच्या पत्राची पाकिस्तान आणि भारतासह मुस्लिम जगतात चर्चा सुरू आहे. मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात पाकिस्तान सरकार, लष्करावर आणि ISI वर तोफ डागली आहे. 1998 मध्ये पाक सरकारने बलुचिस्तानमध्ये केलेले अणुचाचण्यांना त्यांनी नरसंहाराची सुरूवात म्हटले आहे. पाकिस्तानचे हे अणू शस्त्र जगाने ताब्यात घेण्याची विनंती त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य संघर्षाला जागतिक मंचावर पाठिंबा देण्याची विनंती केली.

बलूच जमीन उद्ध्वस्त केली

पत्राच्या सुरुवातीलाच मीर यार बलोच यांनी 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानात केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख केला. पाकिस्तानातील फौजेने नवाज शरीफ सरकारशी हात मिळवणी करून चगई येथे अणुचाचणी केली. बलूच जमीन उद्ध्वस्त केली. या स्फोटामुळे चगई आणि आजूबाजूच्या डोंगरामध्ये आजही रसायनांचा वास येतो. त्यामुळे याभागातील अनेक एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनेक मुलं अपंग झाली आहेत.

पाकिस्तानी लष्कर आणि ISI हेच दहशतवादाचे जनक

या पत्रात बलोच नेत्याने पाकिस्तानची फौज आणि ISI वर थेट निशाणा साधला. हे दोघेच दहशतवादाचे जनक असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना दरवर्षी एक नवीन दहशतवादी संघटना जन्माला घालते. भारत, अफगानिस्तान, बलूचिस्तानच नाही तर अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात पाकिस्तान या संघटनांचा वापर करत असल्याचा दावा मीर यार बलोच यांनी केला. पाकिस्तान हा दहशतवाद्यांची आई आहे. जोपर्यंत पाकिस्तानची पाळंमुळं खोदण्यात येत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपणार नसल्याचे ते म्हणाले.

आता भारताने आमची मदत करावी

जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, तेव्हा बलूच जनतेने भारताचे उघड समर्थन केले. जर ऑपरेशन सिंदूर अजून एक आठवडा सुरू असते तर आज आम्ही भारतासोबत आणि जगासोबत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून चर्चा केली असती, असा दावा बलोच यांनी केला. भारताने आता बलुचिस्तानसोबत अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि बलुचिस्तानमध्ये दिल्लीने एक दुतावास उघडावा असे आवाहन मीर यार बलोच यांनी मोदींना केले.