AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : आपल्या आमदारांची संख्या अधिक, उलट… अमित शाह यांच्या कानमंत्राने अजितदादांच्या अडचणी वाढणार?

Amit Shah on Ajit Pawar : आपली संख्या अधिक मागे हटू नका. महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप आमदारांना एक कानमंत्र दिला आहे. त्यामुळे दादांच्या अडचणी वाढणार का?

Amit Shah : आपल्या आमदारांची संख्या अधिक, उलट... अमित शाह यांच्या कानमंत्राने अजितदादांच्या अडचणी वाढणार?
अमित शाह यांचा कानमंत्रImage Credit source: गुगल
| Updated on: May 28, 2025 | 10:59 AM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. नांदेड येथे सभा घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भूमिकेसह इतर अनेक राजकीय घडामोडींबाबत या दौऱ्यात मंथन झाल्याचे समोर येत आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान आपली संख्या अधिक मागे हटू नका. महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत असे त्यांनी भाजप आमदारांना स्पष्ट बजावले. त्याचवेळी त्यांनी स्वपक्षीय आमदारांना कानमंत्र दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा होत आहे.

आमदारांनी केली दादांची तक्रार

अमित शाह हे नांदेड येथे आले असता काही भाजप आमदारांनी अजितदादांची त्यांच्याकडे तक्रार केली. अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा असा नाराजीचा सूर भाजप आमदारांनी आळवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण उपस्थित होती. दादांची तक्रार केल्यावर मोठे काही घडेल असे वाटत असतानाच अमित शाह यांनी या वादावर जालीम उपाय सुचवला आहे.

अमित शाह यांचा कानमंत्र

अजित पवार यांची तक्रार करणाऱ्या आमदारांना यावेळी अमित शाह यांनी कानमंत्र दिला. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. अशात मागे हटू नका. प्रशासन आणि सरकार पातळीवर कामांचा आक्रमकपणे पाठपुरावा करा. इतका पाठपुरावा करा की अजितदादा यांनी माझ्याकडे तक्रार करावी. अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रार करू नका. उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी आमदारांना केली. आपल्या महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंह अमित शाह यांनी सांगितले.

काय केली तक्रार

अजित पवार हे भाजपाची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा सूर या आमदारांच्या तक्रारीचा होता. 2024 मधील विधानसभेतील भाजप आमदारासमोरील पराभूत उमेदवारांनाच दादा पाठबळ देत असल्याची तक्रार त्यांनी केली. भाजपा विरोधकांना अजितदादा ताकद पुरवत असल्याचा त्यांचा दावा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा तक्रारकर्त्या आमदारांचा होता.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला