Explainer: आनंद कंद कैसा हा सिंध देश माझा, बलुचिस्तान नंतर पाकिस्तानचे अजून किती तुकडे होणार, आता या प्रांतात धुमशान
Balochistan-Sindhudesh-Pakistan : ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचा जगात दबदबा दिसून आला. त्याचा पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळींना सुद्धा बळ मिळाले. बलुचिस्तानमधील आंदोलन ऐरणीवर आले असतानाच आता आणखी दोन प्रांतात स्वातंत्र्य चळवळ जोर धरू लागली आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले. जागतिक मंचावर पत तर गेलीच आहे आता अंतर्गतही मोठे वादळ या देशात घुमत आहे. या देशातील तीन प्रांताना स्वातंत्र्याची आस लागली आहे. बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्य चळवळ ऐरणीवर आली आहे. येथील अनेक प्रांतातून बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सैन्याला हाकलून दिले आहे. अनेक जिल्ह्यात त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. तर दुसरीकडे आता इतर दोन प्रांतात पण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सदन प्रांतावरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर येथील जनतेला बळ मिळाले आहे. आपल्याच लष्कराविरोधात या प्रांतातील लोक सुद्धा लढण्यास तयार झाले आहे. पाकिस्तानचे आणखी किती तुकडे होणार? याची चर्चा दस्तुरखुद्द त्याच देशात सुरू आहे. ...