Imran Khan News: पाकिस्तानच्या जेलमध्ये इमरान खान यांची हत्या? अखेर सत्य समोर! पक्षाकडून मोठा खुलासा

Imran Khan News: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे अडियाल तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना किंवा इतर कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सुरु होत्या. आता इमरान यांच्या पक्षाकडून मोठा खुसाला करण्यात आला आहे.

Imran Khan News:  पाकिस्तानच्या जेलमध्ये इमरान खान यांची हत्या? अखेर सत्य समोर! पक्षाकडून मोठा खुलासा
Imran Khan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 28, 2025 | 4:16 PM

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना अडियाल तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तौशखाना व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना 14 वर्षांची शिक्षा झाली. पण गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. सोशल मीडियावर गुरुवार (27 नोव्हेंबर 2025) रोजी सकाळी अचानक इमरान खान यांच्या तब्येतीबाबत चर्चा सुरू झाली. काही पोस्टमध्ये दावा करण्यात आला की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की ते नेमके कुठे आहेत. #ImranKhanHealthUpdate आणि #WhereIsImranKhan असे हॅशटॅग संपूर्ण दिवस ट्रेंड करत राहिले. आता इमरान खान यांच्याविषयी पक्षाकडून मोठा खुलासा झाला आहे.

पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले की, इमरान खान यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या वास्तवाशी संबंधित नाहीत. त्यांनी म्हटले की, इमरान यांची दररोज वैद्यकीय तपासणी होते आणि त्यांच्या सर्व गरजांकडे लक्ष दिले जाते. राणा सनाउल्लाह यांनी हेही स्पष्ट केले की, इमरान खान यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि ते अडियाल तुरुंगातच आहेत.

पीटीआयचे विधान

इमरान खान यांचा पक्ष पीटीआयचे वरिष्ठ नेते अली झफर यांनीही सांगितले की, सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्या या अफवा आहेत. मात्र, त्यांनी हेही मान्य केले की, कुटुंब आणि वकिलांना भेट न मिळाल्याने संशय निर्माण होत आहे. अली झफर यांनी सरकारकडे विनंती केली की, कुटुंबाला एकदा भेट देण्याची परवानगी दिल्यास संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल आणि गैरसमज दूर होतील. पीटीआयने या मुद्द्यावर सिनेटमध्येही आक्षेप नोंदवला आहे.

कुटुंबाशी भेट बंद असल्याने चिंता आणि विरोध वाढला

पक्षाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून कुटुंबाला इमरान खान यांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही. वकिलांना देखील तुरुंग प्रशासनाने दूर ठेवले आहे. इतका वेळ कोणत्याही प्रकारची भेट न झाल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि अनेक दिवसांपासून अडियाल तुरुंगाबाहेर लोक विरोध करताना दिसत आहेत.

अडियाल तुरुंगात दीर्घ शिक्षा भोगणारे इमरान खान

इमरान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत आणि तौशखाना व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना एकूण 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. माजी क्रिकेट स्टार ते पंतप्रधान बनलेल्या इमरान खान यांचा सतत असा दावा आहे की, त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई ही राजकीय बदल्याच्या भावनेवरून प्रेरित आहे.