AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan Death News: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत नको ते घडलं? अचानक इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू

Imran Khan Death News: आज अडियाला जेल तुटणार का? लापता इमरान खानच्या समर्थकांमुळे घाबरलेली शहबाज शरीफ सरकार; इस्लामाबाद आणि रावलपिंडीत कलम १४४ लागू

Imran Khan Death News: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत नको ते घडलं? अचानक इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू
imran khanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 02, 2025 | 2:42 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) नेमके कुठे आहेत, कसे आहेत, जिवंत आहेत की नाही? पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांच्या तोंडात फक्त हाच एक प्रश्न फिरत आहे. पाकिस्तानच्या (Pakistan News) कानाकोपऱ्यात दबलेल्या आवाजातही लोक याबद्दल बोलत आहेत. इमरान खानचे कुटुंबीय अतिशय चिंतेत आहेत. एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरी इमरान खानबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाहीये. यामुळेच इमरान खानबाबतच्या अफवा थांबण्याचे नाव घेत नाहीत. रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये बंद असलेल्या इमरान खानबद्दल दीड महिन्यांपासून कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांची भेट घडवली जात नाही. याच दरम्यान इमरान खानची मुले कासिम आणि सुलेमान यांनी आशंका व्यक्त केली आहे की अधिकारी काहीतरी असे लपवत आहेत जे दुरुस्त करता येणार नाही. ही भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा इमरान खान यांच्या निधनाच्या अफवा सुरु झाल्या. तसेच इस्लामाबादमध्ये अचानक कलम 144 लागू केला गेला आहे.

पाकिस्तानात इमरान खानची भेट घेण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरू आहे. आतापर्यंत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे नेते इमरान खानला भेटू शकले नाहीत. इमरान खानच्या बहिणी आणि मुले सातत्याने सरकारकडे त्यांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागत आहेत. मात्र सरकार याबाबत मौन बाळगून आहे. यानंतर PTI ने मंगळवारी इस्लामाबाद हायकोर्ट आणि रावलपिंडीच्या अडियाला जेलबाहेर निदर्शने करणार असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे इस्लामाबाद हायकोर्टात इमरान खानशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी कोर्टापासून अडियाला जेलपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

आर-पारच्या मूडमध्ये PTI समर्थक!

इमरान समर्थक आर-पारच्या मूडमध्ये आहेत, त्यांच्या बहिणीही तयार आहेत. इमरान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या समर्थकांनी इमरानची भेट होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही कंबर कसली असून जेलबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक सभा-समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने इस्लामाबाद आणि रावलपिंडीत कलम 144 लागू केले आहे. हा आदेश डेप्युटी कमिशनर डॉ. हसन वकार चीमा यांनी जारी केला असून तो 1 ते 3 डिसेंबर या तीन दिवसांसाठी लागू राहील. आदेशात म्हटले आहे की रावलपिंडी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे, म्हणून लोकांच्या सुरक्षेसाठी, शांतता आणि व्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

हायकोर्ट ते अडियाला जेलपर्यंत मोर्चा

PTI नेते असद कैसर यांनी वृत्तपत्र ‘डॉन’ला सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी खासदार प्रथम इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर एकत्र येतील आणि नंतर तेथून अडियाला जेलपर्यंत मोर्चा काढतील. त्यांचे म्हणणे आहे की हायकोर्टाचे आदेश लागू होत नाहीत आणि जेल प्रशासनही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास तयार नाही. तणाव आणखी वाढला जेव्हा गेल्या आठवड्यात खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांना आठव्यांदा इमरान खानला भेटण्यापासून रोखले गेले, त्यानंतर त्यांनी अडियाला जेलबाहेर धरणे दिले. इमरान खानच्या कुटुंबीयांनाही अनेक आठवड्यांपासून त्यांना भेटू दिले जात नाही.

खैबर पख्तूनख्वा (KPK) मध्ये गव्हर्नर रूलची तयारी?

दुसरीकडे खैबर पख्तूनख्वा (KPK) मध्ये आज गव्हर्नर रूलवर शिक्कामोर्तब होऊ शकते. जर आज प्रांताचे मुख्यमंत्री आफरीदी आंदोलनात उतरले तर शहबाज सरकार हा मोठा निर्णय घेऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे खास सल्लागार आणि ज्येष्ठ नेते राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे की प्रांतात गव्हर्नर रूल हाच शेवटचा पर्याय राहील.

हिम्मत असेल तर गव्हर्नर रूल लावा – आफ्रीदी

खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सुहैल आफ्रीदी यांनी सरकारला आव्हान देताना म्हटले आहे की, “हिम्मत असेल तर खैबर पख्तूनख्वामध्ये गव्हर्नर रूल लावून दाखवा, आम्ही कोणालाही घाबरत नाही.”

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?