जोपर्यंत जनाधार असेल तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष संपणार नाही; इम्रान खान पुन्हा भडकले

| Updated on: May 24, 2023 | 11:36 PM

इम्रान खान यांनी आताही त्यांनी तोच दावा केला आहे की, ज्या व्यक्तीला त्यांच्या पक्षाकडून तिकीट दिले जाईल ती व्यक्तीच ती निवडणूक जिंकणार आहे.

जोपर्यंत जनाधार असेल तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष संपणार नाही; इम्रान खान पुन्हा भडकले
Follow us on

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इम्रान खान यांना रामराम ठोकला आहे.
तर त्यातच देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी शाहबाज सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी म्हटले आहे की, सरकार आणि लष्कराच्या संगनमताने आमच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येत आहे.तर नेत्यांनी तेहरीक-ए-इन्साफमध्ये आपण नसल्याचे सांगितल्यास त्यांना सोडून देण्यात येते असा दबावही सरकार आणि लष्कराकडून टाकण्यात येत आहे.

इम्रान खानने थेट त्यांनी सध्याच्या सरकारवर निशाणा साधत त्यांच्या पक्षावर ही लोकं बंदी घालू शकतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

कोणताही राजकीय पक्ष जोपर्यंत लोकमताकडे आहे तोपर्यंत संपुष्टात येऊ शकत नाही असे खडे बोलही त्यांनी त्यांना सुनावण्यात आले आहे.

एवढेच नाही तर मानवाधिकारावरही कोणी मत व्यक्त करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकार आणि लष्कराच्या भूमिकेमुळे येथील लोक आता भय आणि निराशेने ग्रासले असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यामुळे मी स्वत: माझ्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मुद्याचा पुनरुच्चार करत इम्रान खान यांनी सांगितले की, सध्याचा काळ हा कठीण काळ आहे. मात्र खरी हीच वेळ धीर धरण्याची आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार असताना मंत्रिमंडळ एका प्रचंड कष्टातून बैठकीसाठी येत होते.

त्याच मंत्रिमंडळातील नेत्यांच्या नातेवाईकांवर दबाव टाकून बैठक थांबवण्याचे काम येथे केले गेल्याचा गंभीर आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. या सगळ्या परिस्थितीवर बोलताना सांगितले की, आज हे संकट आमच्यावर आहे मात्र ते उद्या कुणावरही येऊ शकते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी पाकिस्तानातील जनतेला संबोधित करताना म्हणाले की, देशातील नागरिकांना आता विरोधकांच्या कायद्यानुसार आयुष्य व्यतित करावे लागणार आहे.

त्यामुळे ही एक प्रकारची गुलामगिरीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांनी काश्मिरीमधील अन्याय-अत्याचारावर भाष्य केले आहे. जम्मू काश्मीरमध्येही मुलभूत अधिकाऱ्यांची पायमल्ली होत आहे.

इम्रान खान यांनी आताही त्यांनी तोच दावा केला आहे की, ज्या व्यक्तीला त्यांच्या पक्षाकडून तिकीट दिले जाईल ती व्यक्तीच ती निवडणूक जिंकणार आहे.

यावेळी त्यांनी आपल्या पक्षाचा विश्वास देत सांगितले की, आमचा पक्ष संपणार नाही कारण एखाद्या राजकीय पक्षाचा जनाधार संपल्यानंतर तो पक्ष संपत असतो. येथील राजकीय, सामाजिक अस्थिरतेमुळे 9 लाख प्राध्यापकांनी पाकिस्तान सोडले आहे त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.