AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील या देशात सेक्सच्या बदल्यात नोकरी देण्याची प्रथा, आता त्या विरोधात येणार कायदा

सांस्कृतिक अडथळे एक मोठं कारण आहे. त्यामुळे पीडितेला बदनामी आणि अब्रू जाण्याची भिती असते असं सिविल सोसायटी संघटनांचं म्हणणं आहे. पोलिसात जाऊन तक्रार करण्याचीही चांगली व्यवस्था नाहीय. अशा गोष्टिंबद्दल अनौपचारिक चर्चा होतात.

जगातील या देशात सेक्सच्या बदल्यात नोकरी देण्याची प्रथा, आता त्या विरोधात येणार कायदा
physical relation
| Updated on: May 09, 2026 | 7:15 AM
Share

आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये अजूनही अजब वेगवेगळ्या प्रथा आहेत. घाना या देशात ‘सेक्सच्या बदल्यात नोकरीची’ अजब प्रथा आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी आता या प्रथेला गुन्हा घोषित करण्याची मागणी केली आहे. घाना सरकार आता या प्रथेला गुन्हा मानून थेट कारवाई करण्याच्या तयारीत आहे. घानामध्ये फार पूर्वीपासून ही प्रथा सुरु आहे. लोकांना या बद्दल माहिती आहे. पण कोणीही जाहीरपणे बोलायला तयार नाही. 1 मे रोजी कोफोरिडुआ येथे आयोजित एका टाऊन हॉल कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित झाला. एका विद्यार्थीनीने भरती प्रक्रियेत सुरु असलेल्या लैंगिक असमानतेवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रपती महामा म्हणाले की, “या प्रथेविरुद्ध सध्या असलेले नियम आणि धोरणं पुरेशी नाहीत. सेक्सच्या बदल्यात नोकरीची शोषणाची खतरनाक प्रथा आहे. याचा अजिबात स्वीकार केला जाऊ शकत नाही”

“ही सर्वात खराब प्रथांपैकी एक आहे. याला दंडनीय गुन्हा बनवण्यासाठी कायदा मंजूर होणं गरजेच आहे. अनेकदा नियुक्ती करणारा पुरुष असतो. तो नोकरी देण्यासाठी रोमँटिक संबंधांची मागणी करतो. हे मान्य नाही. ही प्रथा बंद होणं गरजेच आहे” असं महामा म्हणाले. घानामध्ये लेबर कायदा आणि गुन्हा कायद्यातंर्गत लैंगिक शोषणावर बंदी आहे.घरगुती हिंसाचार रोखणाऱ्या कायद्यातंर्गतही व्यापक सुरक्षा तरतुदी आहेत. पण या कायद्यांबद्दल आंदोलकांच म्हणणं आहे की, “हे कायदे सामान्यत: नोकरी सुरु झाल्यानंतर होणारं शोषण आणि घरगुती वातावरणात जबरदस्ती विरुद्ध आहेत. नोकरी देण्याच्या बदल्यात सेक्सची मागणी या स्थितीत या कायद्याचा काही विशेष फायदा होत नाही”

खासकरुन युवा महिला टार्गेट

घानामध्ये युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. सरकारी आणि औपचारिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याठी मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. भरती प्रक्रिया पारदर्शक नसते. अशावेळी नोकरी देणारा खासकरुन युवा महिलांकडे अशा प्रकारची मागणी केली जाते. वकील विक्टोरिया ब्राइट यांनी म्हटलय की, “राष्ट्रपतींनी ही भूमिका घेतली, त्याचा मला आनंद आहे. सेक्सच्या बदल्यात नोकरी या शोषणाचा कधीही स्वीकार केला जाऊ शकत नाही” विक्टोरिया ब्राइट या घानाचे माजी राष्ट्रपती जॉन कुफोर यांच्या माजी कायदेशीर सल्लागार होत्या. “जेव्हा कुठला पावरफुल माणून नोकरीच्या बदल्यात सेक्सची मागणी करतो तो एक भ्रष्टाचारच आहे. सभ्य समाजात अशा घटनांचा स्वीकार केला जाऊ शकत नाही” असं ब्राइट म्हणाल्या.

Follow Us
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी