
वेनेजुएलामध्ये ऑपरेशन सुरु असताना अमेरिकी सैन्याच्या एका बड्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकी मीडियानुसार, दक्षिण कमांडचे प्रमुख नौदल एडमिरल एल्विन होल्सी यांनी आपलं पद सोडलं आहे. होल्सी यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. संरक्षण मंत्री पीट हेगसेथे यांच्यासोबतचे संबंध बिघडल्याने त्यांनी आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतला. एक्सियोसनुसार, होल्सी यांच्यावर वेनेजुएला बॉर्डरवर जहाजांची टेहळणी करण्याची जबाबदारी होती. होल्सी यांना वेनेजुएलावर हल्ला करायचा नव्हता. पण अमेरिकन सैन्य इथे मोठं ऑपरेशन सुरु करण्याच्या तयारीत आहे.
डोनाल्ड ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यापासून सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरु आहे. मागच्या तीन महिन्यात टॉप कमांडर स्तराच्या आठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यात जॉइंट चीफ जनरल चार्ल्स “सीक्यू” ब्राउन जूनियर, एनएसए जनरल टीम हॉग, नौदल संचालन प्रमुख एडमिरल लिसा फ्रेंचेटी, तटरक्षक कमांडेंट एडमिरल लिंडा फगन, डग बेक ही प्रमुख नावं आहेत.
‘जे लढू शकत नाहीत, ते युद्धासाठी तयार नाहीत’
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामा सरकार सोबतच्या मतभेदांमुळे दिला आहे. अलीकडेच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीटर हेगसेथ यांनी सैन्याच्या कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. ‘जे लढू शकत नाहीत, ते युद्धासाठी तयार नाहीत, त्यांनी सैन्यातून निघून जावं’
विद्यमान अधिकाऱ्यांवर हा दबाव का टाकला?
एक्सियोसनुसार, भले हे राजीनामे मतभेदांमुळे दिले असतील, पण ट्रम्प यांच्या जुन्या माणसांना सेट करण्यासाठी विद्यमान अधिकाऱ्यांवर हा दबाव टाकण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प हे 2016 ते 2020 दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती होते.
जुन्या कमांडर इतका अनुभव नाही
रिपोर्टनुसार, पहिल्यांदा अमेरिकी सैन्यात अनुभवाची कमतरता दिसून येत आहे. जितके लोक टॉप कमांडर पद सोडत आहे, त्यांच्या जागी नव्या लोकांची भरती सुरु आहे. त्यांच्याकडे जुन्या कमांडर इतका अनुभव नाहीय.
सरकारचा हस्तक्षेप वाढू शकतो
एक्सियोसनुसार, अमेरिकेसारख्या सुपरपावर देशासाठी कठीण काळात अनुभव जास्त आवश्यक आहे. नव्या लोकांच्या भरतीमुळे सैन्यात सरकारचा हस्तक्षेप वाढू शकतो. यामुळे येणाऱ्या काळात महत्वाच्या अभियानाला धक्का बसू शकतो.