AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेकडून पुन्हा B-2 बॉम्बर तैनात, CIA ला ऑपरेशनसाठी मंजुरी, ट्रम्प कुठल्याही क्षणी देतील या नेत्याच्या हत्येचा आदेश

अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी B-2 बॉम्बर विमानांद्वारे जमिनीखाली असलेल्या इराणच्या अणवस्त्र तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा B-2 बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. CIA ला सुद्धा ऑपरेशनसाठी मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेकडून लवकरच जगातील एका मोठ्या नेत्याची हत्या होऊ शकते.

अमेरिकेकडून पुन्हा B-2 बॉम्बर तैनात, CIA ला ऑपरेशनसाठी मंजुरी, ट्रम्प कुठल्याही क्षणी देतील या नेत्याच्या हत्येचा आदेश
Donald Trump
| Updated on: Oct 17, 2025 | 10:43 AM
Share

पुढच्या काही दिवसात अमेरिका आणि वेनेजुएलामधील राजकीय वातावरण तापणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेजुएलाचे राष्ट्रपती मादुरो यांना सत्तेबाहेर करण्याची तयारी सुरु केली आहे. ट्रम्प सरकारने, गुप्तचर संस्था CIA ला वेनेजुएलामध्ये गुप्त ऑपरेशन करण्याची परवानगी दिली आहे. यात प्राणघातक मिशनचा सुद्धा समावेश असू शकतो. थेट मादुरो यांच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. या संपूर्ण मिशनचा उद्देश वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना हटवणं हा आहे. हा एक क्लासिफाइड निर्देश आहे, असं न्यू यॉर्क टाइम्सच्या हवाल्याने अमेरिकी अधिकारी सांगत आहेत. कॅरेबियन क्षेत्रात CIA चे अधिकार वाढवण्यात आले आहेत.

TWZ नुसार, फ्लाइट रडार 24 ने तीन अमेरिकी B-52 बॉम्बवर्षक विमानं वेनेजुएलाच्या दिशेने जाताना पाहिली. या क्षेत्रात अमेरिकी सैनिकांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनी विचारलं, काय CIA ला मादुरोला सरळ करण्याचा अधिकार आहे, त्यावर ट्रम्प हसत बोलले की, मी याचं उत्तर दिलं पाहिजे का? या प्रश्नाला अर्थ नाही.

CIA ला काय आदेश?

नव्या निर्देशांनुसार, CIA ला वेनेजुएला आणि आसपासच्या क्षेत्रात गुप्त ऑपरेशन करण्याचा व्यापक अधिकार मिळाला आहे. यात पॅरामिलिट्री ऑपरेशन आणि ड्रग ट्रॅफिकर्सना टार्गेट करणं याचा समावेश असू शकतो. याला मोठ्या सैन्य स्ट्रेटेजीसोबत जोडलं, तर वेनेजुएलामधील काही भागांवर कारवाई होऊ शकते. CIA नवीन आदेशानुसार कुठलं एक्टिव मिशन चालवत आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही, की हा फक्त कंटिंजेन्सी प्लान आहे.

F-35B जेट तैनात

अमेरिकेने कॅरेबियनमध्ये मोठी सैन्य ताकद जमवून ठेवली आहे. हजारो सैनिक तिथे तैनात आहेत. यात प्यूर्टो रिकोमध्ये फोर्सेज, एम्फीबियस शिप्सवर मरीन आणि अनेक F-35B जेट तैनात आहेत. सोबतच अमेरिका आणि अन्य देशांच्या मल्टीनॅशनल मिलिट्री एक्सरसाइज सुरु आहेत. ड्रग्ससाठी वापरण्यात येणाऱ्या नौकांवर हल्ले केल्याच अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात जवळपास 24 लोक मारले गेले. नशेच्या पदार्थांचा पुरवठा रोखणं आणि मादुरोवर दबाव टाकण्याच्या प्लानचा हा भाग आहे असं व्हाइट हाऊसने सांगितलं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.